IND vs ENG 1st Test Live Updates Day 1 ( Marathi News ) - भारताच्या फिरकीपटूनंनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटीचे पहिले सत्र गाजवले. पाहुण्यांच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात करू दिली खरी, परंतु आर अश्विनने ही जोडी तोडली. बेन डकेटला त्याने पायचीत केले. त्यानंतर रवींद्र जडेजाने ओली पोपला माघारी पाठवले. रोहित शर्माने स्लीपमध्ये अप्रतिम झेल घेतला. १५व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर झॅक क्रॉली पुढे येऊन फटका मारायला गेला अन् मिड ऑफला उभ्या असलेल्या मोहम्मद सिराजने अविश्वसनीय झेल टिपला. या झेलवरून मतमतांतर आहेत, पण तिसऱ्या अम्पायरने निर्णय भारताच्या बाजूने दिला. Ind vs Eng 1st Test Live Updates
जो रूटने मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम; India vs England कसोटीत सर्वाधिक धावा
इंग्लंडच्या फलंदाजांनी पहिल्या अर्ध्या तासात चांगली फटकेबाजी केली. बेन डकेट व झॅक क्रॉली यांनी पहिल्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली, परंतु रोहित शर्माने फिरकी गोलंदाजांना आणले. आर अश्विनने दोन व रवींद्र जडेजाने १ विकेट घेत इंग्लंडला बिनबाद ५५ वरून ३ बाद ६० असे बॅकफूटवर फेकले. बेन डकेट व झॅक क्रॉली यांनी Bazball प्रथा कायम राखताना ६७ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी केली आणि यात ४० धावा या चौकारातून मिळवल्या होत्या. डकेटने ७ चौकारांच्या मदतीने ३९ चेंडूंत ३५ धावा केल्या, तर ओली पोप ( १) व क्रॉली ( १९) स्वस्तात बाद झाले. जो रूट ( Joe Root) व जॉनी बेअऱस्टो या जोडीने डाव सावरला आणि लंच ब्रेकपर्यंत संघाला ३ बाद १०८ धावांपर्यंत पोहोचवले. Ind vs Eng live match, Ind vs Eng Live Scorecard
- अश्विन व जडेजा ही जोडी भारताकडून कसोटीत एकत्रित सर्वाधिक ५०२* विकेट्स घेणारी जोडी बनली. त्यांनी अनिल कुंबळे व हरभजन सिंग या जोडीचा ५०१ विकेट्सचा विक्रम मोडला.
- आर अश्विन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत १५० विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. पॅट कमिन्स व नॅथ लियॉन हे प्रत्येकी १६९ विकेट्ससह अश्विनच्या पुढे आहेत.
- जो रूटने आज महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. इंग्लंड-भारत यांच्यातल्या कसोटी सामन्यांत सर्वाधिक २५४०*( ४६ इनिंग्ज) धावांचा विक्रम रूटने नावावर करताना सचिन तेंडुलकरचा २५३५ ( ५३ इनिंग्ज) धावांचा विक्रम मोडला.