IND vs ENG 1st Test Live Scorecard : इंग्लंडने टॉस जिंकला, ३ फिरकीपटूंसह भारत मैदानावर उतरला; जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

भारत-इंग्लंड यांच्यातली पहिली कसोटी आजपासून सुरू होत आहे आणि पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 09:08 AM2024-01-25T09:08:26+5:302024-01-25T09:08:42+5:30

whatsapp join usJoin us
ind vs Eng 1st test match Rajiv Gandhi international Stadium live score board - England won the toss and decided to bat first, India field with 3 spinners; Know the playing XI | IND vs ENG 1st Test Live Scorecard : इंग्लंडने टॉस जिंकला, ३ फिरकीपटूंसह भारत मैदानावर उतरला; जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

IND vs ENG 1st Test Live Scorecard : इंग्लंडने टॉस जिंकला, ३ फिरकीपटूंसह भारत मैदानावर उतरला; जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG 1st Test Live Updates Day 1 ( Marathi News ) - भारत-इंग्लंड यांच्यातली पहिली कसोटी आजपासून सुरू होत आहे आणि पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कर्णधार रोहित शर्मालाही प्रथम फलंदाजी करायची होती, परंतु कौल इंग्लंडच्या बाजूने लागला. भारताने घरच्या मैदानावर सलग १६ कसोटी मालिका जिंकल्या आहेत आणि त्यामुळे इंग्लंडचा कस लागणार हे निश्चित आहे. भारतीय संघ आज तीन फिरकीपटूंसह मैदानावर उतरणार आहे.


भारताच्या संघात आज रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, केएस भरत, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह हे खेळाडू असणार आहेत. 

भारत-इंग्लंड हेड टू हेड
इंग्लंड संघाला २०१२ पासून भारतीय भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण १३१ कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने ३१ सामने, इंग्लंडने ५० सामने जिंकले आहेत. ५० सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय खेळपट्टींमधील हेड टू हेड रेकॉर्डमध्ये भारताने ६४ पैकी २२ सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडला १४ कसोटी जिंकल्या आहेत.

४ फिरकीपटू, १ जलदगती गोलंदाज...
 भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडने आज त्यांची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. इंग्लंडने जाहीर केलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार फिरकीपटू व एका जलदगती गोलंदाजाचा समावेश केला आहे.  
 इंग्लंडचा संघ ( England Men's XI ) - झॅक क्रॅव्ली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन स्टोक्स ( कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड, जॅक लिच  
 

Web Title: ind vs Eng 1st test match Rajiv Gandhi international Stadium live score board - England won the toss and decided to bat first, India field with 3 spinners; Know the playing XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.