"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  

Ind Vs Eng 1st Test Update: आयपीएलमध्ये सपशेल अपयशी ठरलेला रिषभ पंत इंग्लंडमध्ये खेळायला उतरल्यावर वेगळ्याच रंगात दिसल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये त्याच्या खेळाची चर्चा सुरू आहे. त्यातही पहिल्या दिवशीच्या खेळात पंतने केलेल्या फटकेबाजीनंतर क्रिकेटप्रेमींकडून लखनौ सुपरजायंट्स संघाचे मालक संजीव गोयंका यांना लक्ष्य केले जात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 13:58 IST2025-06-21T13:57:57+5:302025-06-21T13:58:35+5:30

whatsapp join usJoin us
Ind Vs Eng 1st Test: "Goenkaji, are you watching?" Fans took to Lucknow owners' school after Pant's batting in England | "गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  

"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेट संघांमध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी शतके ठोकली. तर रिषभ पंत यानेही दमदार अर्धशतकी खेळी केली. दरम्यान, आयपीएलमध्ये सपशेल अपयशी ठरलेला रिषभ पंत इंग्लंडमध्ये खेळायला उतरल्यावर वेगळ्याच रंगात दिसल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये त्याच्या खेळाची चर्चा सुरू आहे. त्यातही पहिल्या दिवशीच्या खेळात पंतने केलेल्या फटकेबाजीनंतर क्रिकेटप्रेमींकडून लखनौ सुपरजायंट्स संघाचे मालक संजीव गोयंका यांना लक्ष्य केले जात आहे.

यंदाच्या आयपीएलसाठीच्या लिलावात लखनौ सुपरजायंट्स संघाने तब्बल २७ कोटी रुपये खर्च करून रिषभ पंत याला खरेदी केले होते. मात्र आयपीएलच्या संपूर्ण हंगामात रिषभ पंत अपयशी ठरला. तसेच त्याच्या सुमार खेळाचा फटका लखनौ सुपरजायंट्स संघालाही बसला आणि लखनौचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही. आयपीएलमध्ये अपयशी ठरलेला रिषभ पंत इंग्लंडमध्ये वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. तसेच पहिल्याच डावातील अर्धशतकी खेळीने त्याच्याबाबतच्या अपेक्षा वाढवल्या आहेत.

आता रिषभ पंत याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात तो इंग्लंडच्या गोलंदाजांच्या गोलंदाजीवर फटके खेळताना दिसत आहे. या व्हिडीओखाली एका युजरने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिले की, गोयंका साहेब पाहताय ना? हा २७ कोटींचा फटका कुठे खेळला जातोय ते!

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी रिषभ पंत याने दमदार फलंदाजीचं प्रदर्शन करताना आक्रमक अर्धशतकी खेळी केली. त्याबरोबरच त्याने दिवसाचा खेळ संपेपर्यंत कर्णधार शुभमन गिलसोबत अभेद्य शतकी भागीदारी केली होती. रिषभ पंत ६५ धावा काढून नाबाद आहे. त्यामुळे आता खेळाच्या दुसऱ्या दिवशी रिषभ पंतकडे आणखी मोठी खेळी करण्याची संधी असेल.  

Web Title: Ind Vs Eng 1st Test: "Goenkaji, are you watching?" Fans took to Lucknow owners' school after Pant's batting in England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.