Join us  

Ind vs Eng 1st T20 Live : जॉनी बेअरस्टो-वॉशिंग्टन सुंदर भिडले, मैदानावरील पंच भांडण सोडवायला धावले... Video 

Ind vs Eng 1st T20 Live : Washington Sunder टीम इंडियानं विजयासाठी ठेवलेले ७ बाद १२४ धावांचे माफक लक्ष्य इंग्लंडनं सहज पार केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 7:45 AM

Open in App

Ind Vs Eng 1st T20 Live Update Score : इंग्लंड संघानं पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यांत विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. टीम इंडियानं विजयासाठी ठेवलेले ७ बाद १२४ धावांचे माफक लक्ष्य इंग्लंडनं सहज पार केले. जोफ्रा आर्चरची ( Jofra Archer) भेदक गोलंदाजी अन् त्यानंतर जेसन रॉयच्या फटकेबाजीनं टीम इंडियाला हतबल केलं. ३ विकेट्स घेणाऱ्या आर्चरला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळाला. या सामन्यातील इंग्लंडच्या डावातील १४व्या षटकात वॉशिंग्टन सुंदर व जॉनी बेअरस्टो यांच्यात खटका उडाला. मैदानावरील अम्पायरला मध्यस्थी करावी लागली. ( Washington Sunder engage word war with Jonny bairstow)  श्रेयस अय्यरनं रोहित शर्माच्या ११ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी केली बरोबरी, विराटच्या नावावर नकोसा पराक्रम

इंग्लंडचा सहज विजय, मालिकेत १-०ने आघाडीजेसन रॉय ( Jason Roy) आणि जोस बटलर ( Jos Buttler) यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. दोघांनी ८ षटकांत पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. युजवेंद्र चहलनं ( Yuzvendra Chahal) यानं इंग्लंडला पहिला धक्का दिला अन् भारताकडून ट्वेंटी-२०त सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान पटकावला. पण, इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला गेला होता. जेसन रॉयनं ३२ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४९ धावा केल्या. डेवीड मलान २४, तर जॉनी बेअरस्टो २६ धावांवर नाबाद राहिले. इंग्लंडनं ८ विकेट्स व २७ चेंडू राखून सामना जिंकला. Ind Vs Eng 1st T20, Ind Vs Eng 1st T20 Live Score 

नेमकं काय घडलं?१४व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर डेवीड मलाननं ( Dawid Malan) यानं सुंदरच्या गोलंदाजीवर सरळ फटका मारला. सुंदरनं तो झेल टिपला असता, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या बेअरस्टोच्या हेल्मेटला चेंडू आदळला आणि झेल सुटला. त्यानंतर सुंदर इंग्लंडच्या फलंदाजाकडे रागानं बघत होता. दोघांमध्ये शाब्दिक वादही झाला. पण मैदानावरील पंचानं मध्यस्थी केली.   Ind Vs Eng 1st T20 Match Today, Ind Vs Eng 1st T20 Live Match 

पाहा व्हिडीओ...  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडवॉशिंग्टन सुंदर