Join us  

IND vs ENG, 1st ODI, Virat Kohli : विराट कोहलीचा मोठा विक्रम, सचिन तेंडुलकरनंतर 'हा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय

India vs England, 1st ODI : रोहित शर्मा व शिखर धवन यांनी टीम इंडियाला सावध सुरुवात करून दिली. रोहित शर्माच्या कोपऱ्याला चेंडू लागल्यानं त्याला वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. पण, तरीही त्यानं इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 4:10 PM

Open in App

IND vs ENG, 1st ODI :  रोहित शर्माशिखर धवन यांनी टीम इंडियाला दमदार सुरूवात करून दिल्यानंतर कर्णधार विराट कोहलीही फॉर्मात दिसला. शिखर धवननं ३१वे अर्धशतक झळकवताना फॉर्मात परतल्याचे संकेत दिले. दुसरीकडे विराटनंही अर्धशतक झळकावले. त्यानं ६० चेंडूंत ६ चौकारांसह ५६ धावा केल्या. त्यानं दुसऱ्या विकेटसाठी धवनसह १०२ चेंडूंत १०५ धावांची भागीदारी केली. त्यानं या खेळीसह मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. ३३व्या षटकात मार्क वूडनं त्याला बाद केलं.  विराट कोहलीचा फॉर्म 'त्या' लकी गोष्टीमुळे परतला?, पहिल्या वन डेत सिक्रेट ओपन

रोहित शर्मा व शिखर धवन यांनी टीम इंडियाला सावध सुरुवात करून दिली. रोहित शर्माच्या कोपऱ्याला चेंडू लागल्यानं त्याला वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. पण, तरीही त्यानं इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. १६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बेन स्टोक्सनं ही ६४ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. रोहित ४२ चेंडूंत ४ चौकरांसह २८ धावा केल्या. रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीनं सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांचा सलामीवीर म्हणून सर्वाधिकवेळा ५०+ धावांचा विक्रम मोडला. रोहित व शिखर यांनी ३१ वेळा सलामीवीर म्हणून ५०+ धावांची भागीदारी केली.  जखमी होऊनही रोहित शर्मा खेळत राहिला, शिखर धवनसह सचिन-वीरूचा मोठा विक्रम मोडला

रोहित माघारी परतल्यानंतर विराट कोहली आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. विराट कोहली व शिखर धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. धवननं वन डेतील ३१वे अर्धशतक पूर्ण करताना दमदार खेळ केला. विराटनेही अर्धशतक पूर्ण केलं. त्याचे हे वन डेतील ६१ वे अर्धशतक ठरले. त्यानं १०४वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०+ धावा केल्या आहेत आणि त्यानं दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस याचा ( १०३) विक्रम मोडला. आता तो सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा व  रिकी पाँटिंग यांच्या मागे आहे. 1st odi ind vs eng Live Score, 1st odi ind vs eng Live  Video : सॉफ्ट सिग्नलचा विराट कोहलीच्या नव्या भिडूला फटका; अफलातून झेल घेऊनही अम्पायरनं दिलं NOT OUT!

दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरनंतर घरच्या मैदानावर १०००० आंतरराष्ट्रीय धावा करणारा विराट कोहली हा पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्यानं १९५ डावांत हा पल्ला पार करून सर्वात जलद विक्रमही नोंदवला. ( Virat Kohli crosses 10,000 runs on Indian soil in international cricket. He's the fastest to reach this milestone in just 195 innings) 1st odi ind vs eng, ind vs eng Live, 1st odi ind vs eng

घरच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज१४,१९२- सचिन तेंडुलकर१३,११७ - रिकी पाँटिंग१२,३०५ - जॅक कॅलिस१२,०४३ - कुमार संगकारा११,६७९  - माहेला जयवर्धने  १०,००० - विराट कोहली 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीसचिन तेंडुलकररोहित शर्माशिखर धवन