IND vs ENG, 1st ODI : जखमी होऊनही रोहित शर्मा खेळत राहिला, शिखर धवनसह सचिन-वीरूचा मोठा विक्रम मोडला

IND vs ENG, 1st ODI : इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियानं पहिल्या वन डे त कृणाल पांड्या व प्रसिद्ध कृष्णा यांना पदार्पणाची संधी दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 03:16 PM2021-03-23T15:16:17+5:302021-03-23T15:18:10+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 1st ODI : Rohit Sharma and Shikhar Dhawan Surpassed Sachin Tendulkar and Virender Sehwag | IND vs ENG, 1st ODI : जखमी होऊनही रोहित शर्मा खेळत राहिला, शिखर धवनसह सचिन-वीरूचा मोठा विक्रम मोडला

IND vs ENG, 1st ODI : जखमी होऊनही रोहित शर्मा खेळत राहिला, शिखर धवनसह सचिन-वीरूचा मोठा विक्रम मोडला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG, 1st ODI : इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियानं पहिल्या वन डे त कृणाल पांड्या व प्रसिद्ध कृष्णा यांना पदार्पणाची संधी दिली आहे. ( Prasidh Krishna & Krunal Pandya to debut for India). पदार्पणाची कॅप मिळाल्यानंतर कृणालनं ती आकाशाच्या दिशेनं उंचावली आणि वडिलांना श्रद्धांजली वाहिली. हार्दिक व कृणाल यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले होते. वन डे त पदार्पण करताना कृणाल भावनिक झालेला पाहायला मिळाला.1st ODI live, 1st odi ind vs eng Live शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी सलामीला येताना मोठा विक्रम मोडला.  भारताच्या १७ वर्षीय शफाली वर्मानं रचला इतिहास; सचिन तेंडुलकरलाही या वयात हे जमलं नव्हतं

- युझवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला संधी दिली आहे, तर रिषभ पंतला वगळून लोकेश राहुल यष्टिंमागे दिसणार आहे.1st odi ind vs eng Live Score, 1st odi ind vs eng Live updates

- रोहित शर्माशिखर धवन यांनी टीम इंडियाला सावध सुरुवात करून दिली. रोहित शर्माच्या कोपऱ्याला चेंडू लागल्यानं त्याला वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. पण, तरीही त्यानं इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. १६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बेन स्टोक्सनं ही ६४ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. रोहित ४२ चेंडूंत ४ चौकरांसह २८ धावा केल्या.   सचिन तेंडुलकरची BMW X5M कार पुन्हा विक्रीला; OLXवर उपलब्ध, जाणून घ्या किंमत

- रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीनं सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांचा सलामीवीर म्हणून सर्वाधिकवेळा ५०+ धावांचा विक्रम मोडला. रोहित व शिखर यांनी ३१ वेळा सलामीवीर म्हणून ५०+ धावांची भागीदारी केली. ( Rohit Sharma and Shikhar Dhawan Surpassed Sachin Tendulkar and Virender Sehwag As most 50+ runs opening partnership for india. Rohit and Shikhar 31* times)  टीम इंडियात दोन खेळाडूंचे पदार्पण, पहिली वन डे खेळण्यापूर्वी कृणाल पांड्या झाला Emotional!

- वन डे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर-सौरव गांगुली यांनी पहिल्या विकेटसाठी ४४ वेळा ५०+ धावांची भागीदारी केली. त्यानंतर रोहित/धवन ( ३१) आणि सचिन/वीरू (३०) या जोडीचा क्रमांक येतो. 

India XI:  रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल ( यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या. शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा ( Rohit, Dhawan, Kohli (C), Rahul (WK), Iyer, Hardik Pandya, Krunal Pandya, Thakur, Bhuvneshwar, Kuldeep, Krishna)

England XI: जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, इयॉन मॉर्गन, जोस बटलर, बेन स्टोक्स, सॅम बिलिंग, मोइन अली, सॅम कुरन, टॉम कुरन, आदिल राशिद, मार्क वूड ( Roy, Bairstow, Morgan (C), Buttler (WK), Stokes, Billings, Ali, Sam Curran, Tom Curran, Rashid, Wood) 

Web Title: IND vs ENG, 1st ODI : Rohit Sharma and Shikhar Dhawan Surpassed Sachin Tendulkar and Virender Sehwag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.