India vs Australi Warm Up Match Live : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सराव सामना ब्रिस्बेन येथे सुरू आहे. लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी भारताला दमदार सुरूवात करून दिली. त्याने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. भारताने पहिल्या ६ षटकांत ६९ धावा केल्या आणि त्यात रोहितच्या १३ धावांचे योगदान राहिले होते. पण, दोन्ही सलामीवीर ८० धावांत माघारी परतल्यानंतर विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांच्याकडून अपेक्षा होत्या.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माने हे आव्हान स्वीकारले, प्रथम फलंदाजी करून तडगे आव्हान ठेवण्याचा निर्धार बोलून दाखवला. १५ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दित प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधारपद भूषवित असल्याचा अभिमान वाटतोय, असेही रोहित म्हणाला. दरम्यान आजच्या सामन्यात विराट कोहली खेळणार आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही सराव सामन्यांत विराट खेळला नव्हता. ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या मैदानावर लोकेशने उत्तुंग फटके खेचले. त्यापैकी ३ प्रयत्न थेट स्टेडियममध्ये पोहोचले. लोकेशने २७ चेंडूंत ५० धावा करताना ३ षटकार व ६ चौकार खेचले. रोहित नॉन स्ट्रायकरला उभा राहून लोकेशची फटकेबाजी पाहत होता. ६९ धावांत रोहितने १० चेंडूंत १३ धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या मैदानांवर षटकार मारणे सोपे नक्कीच नाही. अशाच एका प्रयत्नात लोकेश झेलबाद झाला. ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर लोकेशने मारलेला फटका अॅश्टन अॅगरने टिपला. लोकेश ३३ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५७ धावा करून बाद झाला. त्यानंतर अॅगरच्या गोलंदाजीवर रोहितने ( १५) स्वीप शॉट खेचला अन् मॅक्सवेलने सीमारेषेवर झेल टिपला. भारताचे दोन्ही सलमावीर ८.२ षटकांत ८० धावा करून माघारी परतले. विराट कोहली व फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादव यांनी सुरेख फटके मारून ११ षटकांत शतकी पल्ला गाठून दिला. मिचेल स्टार्कच्या बाऊन्सरवर विराट १९ धावांवर Fine Lageला झेलबाद झाला. विराटने १३ चेंडूंत १ चौकार व १ षटकार खेचला. त्यानंतर झाय रिचर्डसनच्या शॉर्ट चेंडूवर
हार्दिक पांड्या २ धावांवर माघारी परतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"