Join us  

IND vs AUS : पंड्या आणि राहुल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर कोहलीने सोडले मौन

या दोघांच्या कॉफी विथ करण कार्यक्रमातील आक्षेपार्ह विधानाबद्दल कोहलीने आपले मत व्यक्त केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 1:36 PM

Open in App

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कॉफी विथ करण कार्यक्रमात केलेली आक्षेपार्ह विधानं क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांनी केल्याचे म्हटले गेले. त्यामुळे त्यांच्यावर आता बीसीसीआय कारवाई करणार असल्याचे म्हटले जात आहे. एकिकडे बीसीसीआय कडक भूमिका घेत असताना याप्रकरणी भारताचा कर्णधार विराट कोहलीने मात्र पंड्या आणि राहुलचे समर्थन केले आहे.

कॉफी विथ करण कार्यक्रमातील हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुलच्या विधानांची बीसीसीआयकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. पण कोहलीला मात्र ही गोष्ट गंभीर असल्याचे वाटत नाही. याबाबत कोहली म्हणाला की, " पंड्या आणि राहुल हे दोघेही भारतीय संघाचे सदस्य आहे. त्याचबरोबर ते एक जबाबदार क्रिकेटपटू आहेत. पण त्यांनी जे मत व्यक्त केले आहे, त्याच्या संघाशी किंवा त्यांच्या खेळाशी काहीही संबंध नाही. कारण ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. या त्यांच्या मताशी आमचे काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे या त्यांच्या वक्तव्याचा संघावर किंवा आमच्या कामगिरीवर काहीही परीणाम होणार नाही. आता आम्ही फक्त याबाबत पुढे नेमके काय होते, यावर लक्ष ठेवून आहोत. "

बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरींनीही या विधानांवर आक्षेप घेतला आहे. दोन्ही क्रिकेटपटूंनी कार्यक्रमाला जाण्यासाठी परवानगी घेतली होती का, अशी विचारणा चौधरींनी प्रशासकीय समितीकडे केली आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल बीसीसीआयच्या कोषाध्यक्षांनी प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना इडुल्जींना पत्र लिहिलं आहे. 'कॉफी विथ करण कार्यक्रमात क्रिकेटपटूंनी (हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल) केलेल्या विधानांमुळे भारतीय क्रिकेट आणि क्रिकेटपटूंच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. त्यांचं वर्तन चुकीचं होतं,' असं चौधरींनी पत्रात नमूद केलं आहे.

टॅग्स :विराट कोहलीकॉफी विथ करण 6हार्दिक पांड्या