Join us  

IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियामध्ये जय-पराजयाचा विचार करणार नाही - अजिंक्य रहाणे

सरावानंतर भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची पत्रकार परिषद झाली. यामध्ये आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये जय-पराजयाचा विचार करणार नाही, असे मत अजिंक्यने व्यक्त केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 4:19 PM

Open in App
ठळक मुद्दे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ सध्याच्या घडीला सराव करत आहेत. सरावानंतर भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची पत्रकार परिषद झाली. यामध्ये आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये जय-पराजयाचा विचार करणार नाही, असे मत अजिंक्यने व्यक्त केले आहे.

पत्रकार परिषदेमध्ये अजिंक्य म्हणाला की, " ऑस्ट्रेलियामध्ये आल्यावर आम्ही सराव सामने खेळलो आहोत. त्याचबरोबर आमचा चांगला सरावही झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना आम्ही जय-पराजयाचा विचार करणार नाही. आमच्याकडून सर्वोत्तम कामगिरी कशी होईल, यावर आमचे लक्ष असेल. " 

पराभवातून बरेच काही शिकलोया वर्षात आम्ही दक्षिण आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलो होतो. या दोन्ही दौऱ्यात कसोटी मालिका आम्हाला गमवाव्या लागल्या होत्या. पण या दौऱ्यांमधून आम्ही बरेच काही शिकलो आहोत. या गोष्टीचा  फायदा आम्हाला या दौऱ्यात नक्कीच होईल, असे अजिंक्यने सांगितले.

टॅग्स :अजिंक्य रहाणेभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया