Join us  

IND vs AUS Test : डीन जोन्स यांनी उडवली चेतेश्वर पुजाराची खिल्ली

भारताच्या चेतेश्वर पुजाराच्या एका वक्तव्यावर ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी खिल्ली उडवल्याचे समोर आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 5:55 PM

Open in App
ठळक मुद्देभारतीय संघाने सराव सामन्यात चांगल्या धावा केल्या.दुसरीकडे त्यांनी पाचशेपेक्षा जास्त धावाही दिल्या.याबाबत पुजाराला एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता.

अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताच्या खेळाडूच्या कोणत्याही वक्तव्यावर ऑस्ट्रेलियाचे आजी-माजी क्रिकेपटू हल्लाबोल करत असल्याचे निदर्शनास आले आहे. भारताच्या चेतेश्वर पुजाराच्या एका वक्तव्यावर ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी खिल्ली उडवल्याचे समोर आले आहे.

भारतीय संघाने सराव सामन्यात चांगल्या धावा केल्या, पण दुसरीकडे त्यांनी पाचशेपेक्षा जास्त धावाही दिल्या. याबाबत पुजाराला एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता. यावर पुजारा म्हणाला की, " सराव सामन्यात आमच्या गोलंदाजांनी पाचशेपेक्षा जास्त धावा दिल्या, पण आमच्या गोलंदाजांना नेमके कुठे काय करायचे आहे, ते माहिती आहे. आमच्यासाठी हा चिंतेचा विषय अजिबात नाही. " 

पुजाराच्या या वक्तव्यावर जोन्स यांनी खिल्ली उडवत ट्विटरवर आपली प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, " मला फक्त एवढेच बोलायचे आहे की, त्या पाचशे धावा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी काढल्या आहेत." 

टॅग्स :चेतेश्वर पुजाराभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया