Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्माला तीनही संघात स्थान नाही; BCCI म्हणते...

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वानंतर टीम इंडिया UAEतून थेट ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे. तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची आज घोषणा झाली. निवड समिती प्रमुख सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखाली टीम इंडियाची निवड केली.

By स्वदेश घाणेकर | Updated: October 26, 2020 20:57 IST

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वानंतर टीम इंडिया UAEतून थेट ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे. तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची आज घोषणा झाली. निवड समिती प्रमुख सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखाली टीम इंडियाची निवड केली. नवदीप सैनीला तीनही संघात स्थान देण्यात आले असून दुखापतग्रस्त रोहित शर्माचे नाव निवड केलेल्या एकाही संघात नसल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. वरुण चक्रवर्थीला ट्वेंटी-२० संघात स्थान मिळाले आहे.

ट्वेंटी-20 - विराट कोहली, शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल ( उपकर्णधार व यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्थी. वन डे संघ - विराट कोहली, शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर.  कसोटी संघ - विराट कोहली, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान सहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज या दौऱ्यासाठी चार अतिरिक्त गोलंदाज - कमलेश नागरकोटी, कार्तिक त्यागी, इशान पोरेल, टी नटराजनरोहित शर्मा व इशांत शर्मा यांच्या दुखापतीवर बीसीसीआयची वैद्यकिय टीम लक्ष ठेवून   भारतच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं संभाव्य वेळापत्रक-एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनीदुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनीतिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हलदुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनीतिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेडदुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेडतिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनीचौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्मा