Join us  

IND vs AUS : रोहित शर्मा ऑस्ट्रेलियामध्ये विश्वविक्रमाला गवसणी घालण्यासाठी सज्ज

ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम रोहितला खुणावतो आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 2:39 PM

Open in App
ठळक मुद्देरोहितने आतापर्यंत ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये 2207 धावा केल्या आहेत.ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तीलच्या नावावर आहे. ... तर त्याच्या नावावर सर्वाधिक धावांचा विक्रम होऊ शकतो.

ब्रिस्बेन, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा सलामीवीर रोहित शर्मा सध्या भन्नाट फॉर्मात आहे. आता तर ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर एक विश्वविक्रम रचण्यासाठी रोहित सज्ज झाला आहे. रोहितने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके लगावण्याचा विश्वविक्रम रचला होता. आता ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम रोहितला खुणावतो आहे.

रोहितने आतापर्यंत ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये 2207 धावा केल्या आहेत. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तीलच्या नावावर आहे. गप्तीलने आतापर्यंत 2271 धावा केल्या आहेत. त्यामुळे रोहित गप्तीलपेक्षा 65 धावांची पिछाडीवर आहे.

रोहितने लगावले होते विश्वविक्रमी चौथे शतक

 

भारताकडून सर्वाधिक धावांचा विक्रम रोहितच्या नावावर आहे

भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये तीन ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यामधील पहिला सामना 21 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. या तीन सामन्यांमध्ये रोहितने 65 धावा केल्या तर त्याच्या नावावर सर्वाधिक धावांचा विक्रम होऊ शकतो.

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया