Join us  

IND vs AUS: 'या' एका खेळाडूने फिरवले सामन्याचे चित्र, कोण तुम्हाला माहिती आहे का...

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : उत्कंठावर्धक झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अखेर भारताने ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी विजय मिळवला. अखेरच्या डावात ऑस्ट्रेलियाच्या ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 5:31 PM

Open in App
ठळक मुद्देभारताने ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी विजय मिळवला.हा सामना एका खेळाडूने फिरवला असले म्हटले जात आहे.तो खेळाडू नेमका कोण हे तुम्हाला माहिती आहे का...

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : उत्कंठावर्धक झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अखेर भारताने ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी विजय मिळवला. अखेरच्या डावात ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली. पण अखेर सामना जिंकण्यात कोहलीसेनेला यश आले. हा सामना एका खेळाडूने फिरवला असले म्हटले जात आहे, तो खेळाडू नेमका कोण हे तुम्हाला माहिती आहे का...

या सामन्यात सामनावीर हा पुरस्कार पटकावला तो भारताचा भरवश्याचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने. आणि तोच या विजयाचा खऱ्या अर्थाने नायक ठरला आहे. कारण पहिल्या डावात जेव्हा भारतीय संघ अडचणीत सापडला होता. तेव्हा त्याने 123 धावांची मोलाची खेळी साकारली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 250 धावा केल्या होत्या. या धावा ऑस्ट्रेलियाला करता आल्या नाहीत आणि त्यावेळी भारताला आघाडी मिळाली होती. दुसऱ्या डावातही भारताचे फलंदाज झटपट बाद होत असताना पुजाराने अजिंक्य रहाणेच्या साथीने शतकी भागीदारी रचली होती. पुजाराने या डावात 71 धावांची खेळी साकारली. दोन्ही डावात भारताकडून सर्वाधिक धावा या पुजाराच्याच होत्या. या सामन्यात 194 धावा केल्या. त्यामुळे पुजारानेच सामन्याचा नूर पालटवला, असे म्हणता येऊ शकते.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये 1947 सालापासून दौरा करत आहे. आतापर्यंत भारताने 11 वेळा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आहे. पण यापूर्वी एकाही दौऱ्यामध्ये भारताला ऑस्ट्रेलियामध्ये पहिला सामना जिंकता आला नव्हता. त्यामुळे गेल्या 71 वर्षांमध्ये भारताने पहिल्यांदाच पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे.

या विजयाबरोबरच विराट कोहलीच्या भारतीय संघाने चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये पहिल्याच कसोटीत विजय मिळवण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ आहे.

भारताचा कर्णधार कोहलीने केले खास सेलिब्रेशन, पाहा हा व्हिडीओ

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचेतेश्वर पुजारा