Join us  

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20 साठी भारतीय संघ जाहीर 

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्घच्या ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारताचा अंतिम 12 खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 12:25 PM

Open in App
ठळक मुद्देऑस्ट्रेलियाविरुद्घच्या पहिल्या ट्वेंटी-20साठी भारताचा संघ जाहीररिषभ पंतचा यष्टिरक्षक म्हणून समावेशतीन फिरकी गोलंदाजांना संधी

ब्रिस्बेन, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाविरुद्घच्या ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारताचा अंतिम 12 खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. बुधवारी गॅबा येथे हा सामना होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ परदेशात विजयी पताका रोवण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेत कोहलीला 'कॅप्टन कूल' धोनीच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. 2016 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-20 मालिकेत 3-0 असा विजय मिळवला होता.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी होणाऱ्या या सामन्यासाठी 12 जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघात यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंत संधी मिळाली आहे. दिनेश कार्तिकही संघात आहे. कृणाल पांड्या, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या तीन फिरकी गोलंदाजांना संधी मिळाली असून यापैकी एक उद्याच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. 

फलंदाजीत कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि लोकेश राहुल यांच्यावर भिस्त असेल, तर भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा आणि खलील अहमद जलद मारा सांभाळतील. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीबीसीसीआय