Join us  

IND vs AUS 4th Test : विराट कोहली म्हणतो हा संघ नाही, हे तर... !

IND vs AUS 4th Test: भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर नमवण्याचा पराक्रम केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 1:21 PM

Open in App

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघ कांगारूंच्या देशात दाखल होण्यापूर्वी खेळाडूंच्या कामगिरीबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड मालिकेतील पराभवामुळे ऑस्ट्रेलियातील विराटसेनेच्या कामगिरीकडे लक्ष लागून राहिले होते. मात्र, भारतीय संघाने सर्वांना चुकीचे ठरवत 2-1 ने मालिका खिशात घातली. भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर नमवण्याचा पराक्रम केला. 1947 साली भारतीय संघ प्रथम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता, परंतु त्यांना कसोटी मालिका विजयासाठी 72 वर्षे प्रतिक्षा पाहावी लागली. 

अॅडलेड आणि मेलबर्न कसोटीत विजय मिळवत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली होती. चौथ्या कसोटीतही भारताचेच पारडे जड होते. सिडनी कसोटीत  भारताने पहिल्या डावातच 622 धावांचा डोंगर उभा केला. चेतेश्वर पुजारा ( 193 ) आणि रिषभ पंत ( 159* ) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला. ऑसींचा पहिला डाव 300 धावांवर गडगडला.  भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन देत आपला मालिका विजय पक्का केला. चौथ्या दिवशी बिनबाद 6 धावांवर असताना खेळ थांबला. सोमवारी पाऊस कायम राहिल्याने खेळ झाला नाही.  मालिकेत तीन शतकांसह 521 धावा करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. 

भारतीय गोलंदाजांनीही दमदार कामगिरी केली. या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी एकूण 70 विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराने प्रभावी गोलंदाजी केली. या मालिका विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने ट्विट केले. त्यात त्यानं लिहिलं की,'' या संघाचा सदस्य असल्याचा अभिमान आहे. हा फक्त संघ नाही, तर एक कुटूंब आहे. या प्रवासातील प्रत्येक चढ उतारांच्या प्रसंगात आम्ही एकत्र होतो.'' भारतीय संघातील सदस्यांनी केलेली ट्विट्स... 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीमयांक अग्रवालअजिंक्य रहाणेलोकेश राहुलचेतेश्वर पुजाराजसप्रित बुमराह