Join us  

Ind vs Aus 4th test: भारताचा पहिला डाव 622 धावांवर घोषित

चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांच्या दीडशतकाच्या जोरावर भारताला ही दमदार मजल मारता आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 11:43 AM

Open in App

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात पहिला डाव 7 बाद 622 या धावसंख्येवर घोषित केला आहे. चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांच्या दीडशतकाच्या जोरावर भारताला ही दमदार मजल मारता आली.

चेतेश्वर पुजाराने आपल्या खास शैलीत आजही दमदार फलंदाजी केली, पण त्याला द्विशतक झळकावता आले नाही. नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर पुजारा बाद झाला आणि भारतीय चाहते थोडेसे निराश झाले. पुजाराने तब्बल 22 चौकारांच्या जोरावर 193 धावा केल्या. पुजारा बाद झाल्यावर पंतने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. पंतने 15 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद 159 धावा केल्या. त्यामुळेच भारताला सहाशे धावांचा पल्ला गाठता आला. रवींद्र जडेजानेही 81 धावांची दमदार खेळी साकारली.

 

 

 

 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारिषभ पंतचेतेश्वर पुजारा