Join us  

IND vs AUS 3rd Test : दिग्गजांकडून 'विराट'सेनेचं तोंडभरुन कौतुक!

IND vs AUS 3rd Test: बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाने शेवटच्या दिवशी विजय मिळवला. भारतीय संघाने कंगारूंवर 137 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 10:04 AM

Open in App

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाने शेवटच्या दिवशी विजय मिळवला. भारतीय संघाने कंगारूंवर 137 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन भूमिवर 2-1 अशा फरकासह मालिकेत आघाडी घेतली आहे. भारताच्या 399 धावांचा पाठलाग करताना कांगारूंचा दुसरा डाव 261 धावांवर आटोपला. जसप्रीत बुमराने सामन्यात ( 6/33 व 3/53) नऊ विकेट घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याला मॅन ऑफ दी मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. भारतीय संघाचा हा ऐतिहासिक विजय आहे. 'विराट'सेनेच्या या विजयाचे दिग्गजांनी तोंडभरुन कौतुक केलं.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीसचिन तेंडुलकरमयांक अग्रवालबीसीसीआय