ठळक मुद्देमयांकने पदार्पणातच आपलं नाणं खणखणीत वाजवलेअर्धशतकी खेळीसह मयांकने 71 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडलापरदेशात पदार्पणात सर्वोत्तम खेळी करण्याचा विक्रमात दुसरे स्थान
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताने तिसऱ्या कसोटीत मयांक अग्रवाल आणि हनुमा विहारी ही नवी जोडी सलामीला उतरवली. दोघांनी भारताला सकारात्मक सुरुवात करून दिली. मयांकने पदार्पणातच आपलं नाणं खणखणीत वाजवून निवड समितीला प्रभावित केले. त्याची 76 धावांची खेळी पॅट कमिन्सने संपुष्टात आणली. ऑस्ट्रेलियात पदार्पणात सलामीवीराने केलेली ही सर्वोत्तम खेळी ठरली. त्याने या खेळीसह 71 वर्षांपूर्वीची दत्तू फडकर यांचा विक्रम मोडला. एक धाव आणखी केली असती तर त्याला आणखी एक विक्रम नावावर करता आला असता.
परदेशात पदार्पणात एकाही भारतीय सलामीवीराला शतक झळकावता आलेले नाही आणि मयांक हा पराक्रम करेल, अशी आशा होती. 48 धावांवर असताना मयांकने चौकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियात पदार्पणात सर्वाधिक धावांचा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे. याआधी हा विक्रम दत्तू फडकर यांच्या नावावर होता. त्यांनी 1947साली झालेल्या सिडनी कसोटीत पदार्पणात 51 धावा केल्या होत्या. मयांकने 71 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
मयांकने 161 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार व 1 षटकार खेचून 76 धावांची खेळी केली. त्याने या खेळीसह परदेशात पदार्पणात सलामीवीराने केलेल्या सर्वोत्तम खेळीच्या विक्रमात दुसऱ्या स्थानी झेप घेतली. त्याने 1971 साली सुनील गावस्कर यांनी नोंदवलेल्या नाबाद 67 धावांची विक्रम मोडला. या विक्रमात सुधीर नायक 77 धावांसह आघाडीवर आहे. त्यांनी 1974 मध्ये इंग्लंडविरुद्ध बर्मिंघम कसोटीत 77 धावा केल्या होत्या.
![]()