Join us  

IND vs AUS 2nd Test : कर्णधारासारखे वागा, कोहली-पेनला पंचांचा दम 

IND vs AUS 2nd Test: भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यांच्यात दुसऱ्या दिवसाच्या चौथ्या दिवशी शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 10:26 AM

Open in App
ठळक मुद्देविराट कोहली व टीम पेन यांच्यात शाब्दिक चकमकचौथ्या दिवशी दोन्ही संघाचे कर्णधार भिडलेअंपायर ख्रिस जॅफनी यांची मधस्थी

पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यांच्यात दुसऱ्या दिवसाच्या चौथ्या दिवशी शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या 4 बाद 172 धावा असताना कोहली व पेन यांच्यात वाद झालेला पाहायला मिळाला. त्यांच्या या वादात पंच ख्रिस जॅफनी यांनी हस्तक्षेप केला आणि दोघांनी कर्णधारपदाची जाणीव करून दिली. जॅफनी यांच्या मध्यस्थीनंतर गंभीर वातावरण निवळले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कोहलीने शतक झळकावून भारताची आघाडीच्या दिशेने वाटचाल करून दिली. पण, वैयक्तिक 123 धावांवर असताना पंचांनी कोहलीला झेलबाद दिले. पीटर हॅण्ड्सकोम्बच्या हातात जाण्यापूर्वी चेंडूने जमिनीचे चुंबन घेतल्याचे स्पष्ट दिसत असतानाही पंचांनी कोहलीला बाद ठरवले. DRS नंतरही चौथ्या पंचांनी निर्णय कायम राखल्याने कोहली संतापला आणि रागातच त्याने मैदान सोडले. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात त्याने चांगलाच राग काढला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना डिवचण्याचा पवित्रा घेतला. तो सातत्याने ऑसी खेळाडूंकडे जाऊन टीका टिप्पणी करत होता. तसेच फलंदाज बाद होताच त्यांच्याकडे पाहून विचित्र हातवारेही करताना दिसला. सामन्याच्या चौथ्या दिवशी कोहलीने डिवचण्याचे सत्र कायम राखले. चौथ्या दिवशी कोहली आणि पेन यांच्यातील शाब्दिक चकमक चर्चेत राहिली. त्यात जॅफनी यांनी मध्यस्थी केली. या तिघांमधील संभाषण असे. टीम पेनचा विराट कोहलीला प्रश्न : काल तुझा पारा चढलेला होता, तर मग आज इतका शांत का आहेस?ख्रिस जॅफनीः आता गप्प बसापेनः आम्हाला बोलण्याची मुभा आहे.जॅफनीः नाही. खेळ खेळा. तुम्ही दोघंही कर्णधार आहात, जबाबदारीने वागा.पेनः आम्ही चर्चा करत आहोत.. कोणताही वाद घालत नाही. जॅफनीः पेन तू कर्णधार आहेतपेनः विराट तू शांतच राहा... 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहली