Join us  

IND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव, कोहलीकडून स्लेजिंगने उत्तर

IND vs AUS 2nd Test: भारतीय कर्णधार विराट कोहलीला चुकीच्या पद्धतीने बाद दिलेल्या निर्णयामुळे दुसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस गाजला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 3:28 PM

Open in App
ठळक मुद्देऑस्ट्रेलियाच्या दिवसअखेर 4 बाद 132 धावासलामीवीर आरोन फिंच जायबंदीऑस्ट्रेलियाकडे 175 धावांची आघाडी

पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय कर्णधार विराट कोहलीला चुकीच्या पद्धतीने बाद दिलेल्या निर्णयामुळे दुसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस गाजला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 326 धावांचा पाठलाग करताना भारताचा पहिला डाव 283 धावांवर गडगडला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावातील 43 धावांच्या आघाडीत 132 धावांची भर घातली. सलामीवीर आरोन फिंचची दुखापत ही ऑस्ट्रेलियासाठी चिंतेची बाब आहे. उस्मान ख्वाजा ( 41) आणि कर्णधार टीम पेन ( 8) खेळत आहेत. कोहलीनेही यजमानांच्या फलंदाजांवर चांगलाच शाब्दीक मारा केला. त्याच्या या पवित्र्याने चाहते चांगलेच खूश झाले. कोहलीने दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र गाजवले. पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगालच समाचार घेतला. कोहलीने 257 चेंडूंत 13 चौकार व 1 षटकार खेचून 123 धावा केल्या. कोहली बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला भारताचे शेपूट गुंडाळण्यात फारसा वेळ लागला नाही. रिषभ पंतने (36) संघर्ष केला. भारताचा पहिला डाव 283 धावांवर गडगडला. नॅथन लियॉनने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. पहिल्या डावातील 43 धावांच्या आघाडीत भर टाकण्याचा प्रयत्नात ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज माघारी परतले. सलामीवीर अॅरोन फिंचही दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला आणि तो पुन्हा फलंदाजीला येण्याची शक्यता कमीच आहे. मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांनी तिखट मारा केला. पण, उस्मान ख्वाजाने एका बाजूने संयमी खेळ करताना ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीबीसीसीआय