मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या बनवू दिली नाही. मात्र पावसाच्या आगमनाने भारतीयांच्या आनंदावर पाणी फेरण्याचा प्रयत्न केला. पाऊस सुरू झाला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या 19 षटकांत 7 बाद 132 धावा झाल्या होत्या. डकवर्थ लुईस प्रणालीनुसार भारतासमोर 19 षटकांत 137 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. पण, त्यानंतर पाऊस सुरूच राहिल्याने हे लक्ष्य 11 षटकांत 90 असे करण्यात आले. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्याने सामना रद्द करण्यात आला.
तासभर पावसाचा लपाछपीचा खेळ सुरू असताना प्रेक्षक मात्र भारतीय संघाला चिअर करताना भांगडा करत होते. त्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. शिखर धवन, रोहित शर्मा,
विराट कोहली फलंदाजीसाठी सज्ज होते. मात्र, धवन व रोहित मैदानावर उतरणात तोच पुन्हा पाऊस सुरू झाला. प्रेक्षक नृत्य करण्यात व्यग्र होते. संघाच्या डगआऊटमध्ये बसलेला कोहलीही चाहत्यांच्या सूरात सूर मिसळताना दिसला.
![]()
एरवी चेहऱ्यावर प्रचंड दडपण घेऊन फिरणारा, अरे ला कारे करणारा कोहली कूल मुडमध्ये दिसला. डगआऊटमध्ये बसून तो भांगडा करत होता आणि धवनलाही काही स्टेप्स शिकवताना दिसला.