IND vs AUS 2nd ODI Live : टीम इंडियाचा २६ षटकांत खेळ खल्लास! मिचेल स्टार्कने घेतल्या पाच विकेट्स, नंतर सारेच परतले माघारी

India vs Australia 2nd ODI Live Update : स्टीव्ह स्मिथ कर्णधार म्हणून किती धोकादायक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 03:56 PM2023-03-19T15:56:35+5:302023-03-19T15:56:59+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS 2nd ODI Live Update Marathi : India bowled out for just 117, Mitchell Starc on fire with 5/53, Sean Abbott 3/23, Nathan Ellis 2/13 | IND vs AUS 2nd ODI Live : टीम इंडियाचा २६ षटकांत खेळ खल्लास! मिचेल स्टार्कने घेतल्या पाच विकेट्स, नंतर सारेच परतले माघारी

IND vs AUS 2nd ODI Live : टीम इंडियाचा २६ षटकांत खेळ खल्लास! मिचेल स्टार्कने घेतल्या पाच विकेट्स, नंतर सारेच परतले माघारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia 2nd ODI Live Update : स्टीव्ह स्मिथ कर्णधार म्हणून किती धोकादायक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. फॉर्मात असलेल्या मिचेल स्टार्ककडून त्याने सलग षटकं फेकून घेतली अन् मार्शनेही चार विकेट्स घेत त्याचा विश्वास सार्थ ठरवला. त्यानंतर सीन एबॉट व नॅथन एलिस या जलदगती गोलंदाजांनी धक्के दिले. स्मिथने ( Steve Smith) दोन अविश्वसनीय झेल घेताना रोहित शर्मा व हार्दिक पांड्या यांना माघारी पाठवले. 

विराट कोहलीला DRS घ्यायचा होता, परंतु रवींद्र जडेजाने नकार दिला अन्..., Video 


मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकात शुबमन गिलला माघारी जाण्यास भाग पाडले. पॉईंडवर मार्नस लाबुशेनने झेल घेतला. रोहित शर्मा व विराट कोहली यांनी सुरेख फटकेबाजी मारून भारतावरील दडपण कमी केलं... पण, मिचेल स्टार्कने पुन्हा घात केला. त्याच्या भन्नाट चेंडूवर रोहितला ( १३) माघारी जावे लागले आणि स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथने तितकाच अप्रतिम झेल घेतला. पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव ( ०) LBW झाला. 


स्टार्कने मागील सामन्यातील स्टार लोकेश राहुलला ( ९) पायचीत केले. लोकेशने DRS घेतला, परंतु तो वाया गेला.  त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याला ( १) सीन एबॉटने माघारी पाठवले. स्टीव्ह स्मिथने हवेत झेप घेताना एका हाताने अफलातून झेल टिपला अन् भारताचा निम्मा संघ ४९ धावांत माघारी परतला. विराट एका बाजूने भारताची खिंड लढवत होता आणि त्याला रवींद्र जडेजाची चांगली साथ मिळाली. या दोघांनी ३६ चेंडूंत २२ धावांची भागीदारी केली, परंतु नॅथन एलिसने भारताला मोठा धक्का दिला. ३५ चेंडूंत ३१ धावा करणाऱ्या विराटला त्याला LBW केले. 


एलिसने त्याच्या पुढच्या षटकात जडेजालाही ( १६) माघारी पाठवून भारताला सातवा धक्का दिला. जडेजाने चुकीचा फटका मारला अन् यष्टिरक्षक अॅलेक्स केरीच्या हाती चेंडू सहज विसावला. स्टीव्ह स्मिथने चांगली कॅप्टन्सी केली. गोलंदाजीत बदल करण्याचा त्याचा प्रयोग पुन्हा यशस्वी ठरला अन् कुलदीप यादव ( ४) एबॉटच्या गोलंदाजीवर  स्क्वेअर लेगला ट्रॅव्हीड हेडच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पुढच्याच चेंडूवर मोहम्मद शमीही माघारी परतला. अक्षर पटेलने आक्रमक पवित्रा स्वीकारताना स्टार्कला सलग दोन षटकार खेचले. स्टार्कने अखेरची विकेट मोहम्मद सिराजचा त्रिफळा उडवून घेतली आणि भारताला २६ षटकांत ११७ धावांवर ऑल आऊट केले. स्टार्कने पाच विकेट्स घेतल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: IND vs AUS 2nd ODI Live Update Marathi : India bowled out for just 117, Mitchell Starc on fire with 5/53, Sean Abbott 3/23, Nathan Ellis 2/13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.