Join us  

IND vs AUS 1st Test : महान खेळाडूंच्या पंक्तीमध्ये कोहलीने पटकावले स्थान

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात कोहलीने काही धावा करत महान खेळाडूंच्या पंक्तीमध्ये स्थान पटकावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 12:15 PM

Open in App
ठळक मुद्देसचिन तेंडुलकर, व्हीव्हीव्ही एस लक्ष्मण व राहुल द्रविड यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात कोहलीने काही धावा करत महान खेळाडूंच्या पंक्तीमध्ये स्थान पटकावले आहे.  2014 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता, परंतु कोहलीसाठी हा दौरा संस्मरणीय ठरला होता. त्याने त्या दौऱ्यात खोऱ्याने धावा केल्या होत्या. या गोष्टीचा फायदा त्याला या दौऱ्यातही झाला आहे.

आठ धावा करत कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच भूमीत 1000 धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर सचिन तेंडुलकर, व्हीव्हीव्ही एस लक्ष्मण व राहुल द्रविड यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. कोहलीने क्रिकेट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात अर्धशतकी खेळी करून यजमानांना धोक्याचा इशारा दिला होता. कोहलीने घरच्या मैदानावर झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत 92च्या सरासरीने 184 धावा केल्या आहेत. 2014-15च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहलीने 8 डावांत 692 धावा केल्या होत्या. स्टीव्हन स्मिथनंतर ( 769) त्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला होता. त्या मालिकेत कोहलीने चार शतकं आणि एक अर्धशतक झळकावलं होतं.

ऑस्ट्रेलियात कोहलीने यजमानांविरुद्ध 8 सामन्यांत 992 धावा केल्या आहेत. त्याला 1000 धावांचा पल्ला गाठण्यासाठी 8 धावांची गरज होती. या सामन्याच्या पहिल्या डावात कोहली तीन धावांवर बाद झाला होता. त्यामुळे दुसऱ्या डावात पाच धावा केल्यावर त्याने हजार धावांचा टप्पा गाठला आहे. 

 ऑस्ट्रेलियात त्यांच्याचविरुद्ध 1000 धावा करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरणार आहे. या विक्रमात तेंडुलकर आघाडीवर आहे. त्याने 1991-2012 या कालावधीत 20 सामन्यांत 1809 धावा केल्या आहेत आणि त्यात सह शतकं आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ लक्ष्मण ( 15 सामन्यांत 1236 धावा) आणि द्रविड ( 15 सामन्यांत 1143 धावा) यांचा क्रमांक येतो. 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया