Join us  

IND vs AUS 1st Test : प्रत्येक जण पुजारा होऊ शकत नाही, पंतने ख्वाजाला सुनावले

ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करत असताना भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजाला खडे बोल सुनावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 5:30 PM

Open in App
ठळक मुद्देपहिल्या डावात फलंदाजी करत असताना भारताचा डाव चेतेश्वर पुजाराने सावरला.पुजाराने जशी फलंदाजी केली, त्याची नक्कल ख्वाजा करत होता.त्यावेळी पंतने ख्वाजाला चांगलेच सुनावले.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कसोटी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात शाब्दिक बाणांना दोन्ही संघांकडून सुरुवात झाली आहे. त्यामुळे दोन्ही संघांकडून बरीच स्लेजिंग या पहिल्या सामन्यातील तीन दिवसांमध्ये पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करत असताना भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजाला खडे बोल सुनावले.

पहिल्या डावात फलंदाजी करत असताना भारताचा डाव चेतेश्वर पुजाराने सावरला. पुजाराच्या शतकाच्या जोरावर भारताला 250 धावा करता आल्या होत्या. पुजाराने जशी फलंदाजी केली, त्याची नक्कल ख्वाजा करत होता. त्यावेळी पंतने ख्वाजाला चांगलेच सुनावले.

पहिल्या डावात फलंदाजी करत असताना पंतवर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क शाब्दिक हल्ला करत होता. त्यावेळी ख्वाजाही त्याला साथ देत होता. या गोष्टीचा बदला पंतने यावेळी घेतला. ख्वाजा फलंदाजी करत असताना पंत त्याला म्हणाला की, " प्रत्येक जण पुजारा होऊ शकत नाही." त्यानंतर मात्र ख्वाजाची एकाग्रता भंग पावली आणि तो बाद झाला.

पंत ख्वाजाला नेमकं काय बोलला ते पाहा

टॅग्स :रिषभ पंतभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया