IND vs AUS 1st ODI Virat Kohli Falls For Duck vs Mitchell Starc : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी जवळपास ७ महिन्यांच्या कालावधीनंतर आंतरारष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली. रोहित शर्मा अवघ्या ८ धावा करून माघारी फिरल्यावर सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर खिळल्या होत्या. पण तो ८ चेंडूचा सामना करून शून्यावर बाद झाल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहली शून्यावर बाद होण्याची तशी ही पहिली वेळ नाही. पण ऑस्ट्रेलियन मैदानात पहिल्यांदाच त्याच्यावर ८ चेंडू खेळून खाते न उघडता तंबूत परतण्याची वेळ आली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऑफस्टंप बाहेरील चेंडू मारून फसला किंग कोहली, स्टार्कला मिळालं यश
भारतीय संघाच्या धावफलकावर १३ धावा असताना रोहित शर्माच्या रुपात जोश हेजलवडूनं आपल्या संघाला पहिली विकेट मिळवून दिली. सलामीवीर स्वस्तात माघारी फिरल्यावर विराट कोहली पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर आपली बादशाहत दाखवून देईल, अशी अपेक्षा होती. पण डावाच्या सातव्या षटकात, मिचेल स्टार्कने त्याला फसवले. स्टार्कच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर किंग कोहलीने ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूवर ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला. बॅकवर्ड पॉइंटवर कूपर कॉनॉली याने सर्वोत्तम झेल टिपत कोहलीचा खेळ खल्लास केला.
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
किंग कोहलीच्या नावे झाा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहली तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. पण ऑस्ट्रेलियन मैदानात पहिल्यांदाच त्याच्यावर ही वेळ आली. एवढेच नाही तर एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक चेंडूचा सामना खेळून शून्यावर बाद होण्याची त्याची ही दुसरी वेळ ठरली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ चेंडू खेळून शून्यावर बाद होण्याआधी २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील लखनौच्या मैदानात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली ९ चेंडूचा सामना केल्यावर खाते न उघडता तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहली ३९ व्या वेळी शून्यावर बाद झाला आहे. फक्त झहीर खान (४३) आणि इशांत शर्मा (४०) हे त्याच्या पुढे आहेत.