IND vs AUS 1st ODI Shubman Gill Breaks MS Dhoni Big Record : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पर्थच्या मैदानातील वनडे सामन्यातून शुबमन गिलनं आपल्या आणखी एका नव्या इनिंगची सुरुवात केली. कसोटी संघाचे नेतृत्व करताना इंग्लंड दौरा गाजवल्यावर आता एकदिवसीय संघाची मोठी जबाबदारीही त्याच्या खांद्यावर पडली आहे. रोहित शर्माची जागा घेताच शुबमन गिलनं महेंद्रसिंह धोनीचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
फलंदाजीत नापास, पण नावे झाला महारेकॉर्ड
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पर्थच्या मैदानातून वनडेतील नव्या पर्वाची सुरुवात करताना कसोटीप्रमाणेच इथंही शुबमन गिलनं नाणेफेकीचा कौल गमावला. याशिवाय फलंदाजीत त्याच्या पदरी निराशा आली. पण त्यातही त्याने मोठा डाव साधला आहे. शुबमन गिल हा वनडे, कसोटी आणि टी-२० तिन्ही प्रकारात भारतीय संघाचा युवा कर्णधार ठरला आहे. २६ वर्षे आणि ४१ दिवस वय असताना गिलनं तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करत धोनीला मागे टाकले. गिल हा कसोटी आणि वनडे संघाचा नियमित कर्णधार असून २०२४ मध्ये त्याने झिम्बाब्वे विरुद्ध टी-२० संघाचे नेतृत्व केल्याचे पाहायला मिळाले होते. महेंद्र सिंह धोनीनं २६ वर्षे आणि २७९ वय असताना क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
टॉस सह बॅटिंगमध्ये गिलचा फ्लॉप शोचा सिलसिला
पर्थच्या मैदानात नाणफेकीचा कौल महत्त्वाचा होता. पण इथं शुबमन गिलला कॅप्टन्सीत पहिला धक्का बसला. भारतीय संघाने १६ वा आणि शुबमन गिलनं आपल्या नेतृत्वाच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावली. कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यावर ६ सामन्यात टॉस गमावल्यावर दिल्लीच्या मैदानातील वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात त्याने पहिला टॉस जिंकला होता. आता पुन्हा वनडेत त्याची सुरुवात नाणेफेक गमावत झाली आहे. इथं ऑस्ट्रेलिया संघानं बाजी मारत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी २६-२६ षटकांचा करण्यात आला. भारतीय संघाने ९ षटकात १३६ धावा केल्या. शुबमन गिलनं चांगली सुरुवात केली. पण तो फार काळ टिकला नाही. अवघ्या १० धावांवर बाद झाल्याचे पाहायला मिळाले. भारताकडून लोकेश राहुलनं सर्वाधिक ३८ तर त्याच्यापाठोपाठ अक्षर पटेलनं ३१ धावांच खेळी केली.