India vs Australia, 1st ODI Nitish makes debut India Playing XI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थच्या मैदानात पहिला वनडे सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातून शुबमन गिलनं वनडे संघातील कॅप्टनच्या रुपात नवी सुरुवात केली. पण कसोटी प्रमाणेच वनेत कॅप्टन्सी करताना पहिल्या सामन्यात त्याने टॉस गमावला. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्श याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
शुबमन गिलनं भारतीय संघाची घोषणा करताच पर्थच्या मैदानात नितीश कुमार रेड्डी पदार्पण करत असल्याचे स्पष्ट झाले. तो पहिल्या सामन्यात बॅटिंग बॉलिंगमध्ये कशी छाप सोडणार ते पाहण्याजोगे असेल. भारताचा माजी कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मानं युवा ऑलराउंडरला वनडे डेब्यू कॅप दिल्याचे पाहायला मिळाले. बीसीसीआयने अधिकृत एक्स अकाउंटवरुन खास फोटोही शेअर केले आहेत.
भारत प्लेइंग इलेव्हन :
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन :
ट्रॅविस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (कर्णधार), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड.