IND vs AUS 1st ODI 1st ODI Mitchell Marsh Australia Won By 7 Wkts Against Team India : शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या नव्या पर्वाची सुरुवात ही पराभवानं झाली आहे. पर्थच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या सामन्यात एकही गोष्ट भारतीय संघाच्या बाजूनं घडली नाही. पावसाच्या व्यत्ययामुळे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना प्रत्येकी २६-२६ षटकांचा खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने ७ विकेट्स राखून विजय मिळवत ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवरील ऑस्ट्रेलियन संघाचा हा एकदिवसीय सामन्यातील पहिला विजय ठरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पावसाचा व्यत्यय! टीम इंडियानं चार ब्रेकमध्ये पूर्ण केला २६ षटकांचा खेळ
ऑस्ट्रेलिया संघही या मालिकेत मिचेल मार्शच्या रुपात नव्या कर्णधारासह नव्या भिडूंच्या साथीनं मैदानात उतरला होता. दुसऱ्या बाजूला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सलग ७ विजय मिळवणारा भारतीय संघ शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरला होता. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्यांदा फलंदाजी करताना चार वेळा भारतीय संघातील फलंदाजांवर मैदान सोडून पॅव्हेलियनमध्ये परतण्याची वेळ आली. दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियानं एकसारखे खेळत विजयी डाव साधला. ही गोष्ट सामन्याचा एक टर्निंग पॉइंटच होती.
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
आघाडीच्या फलंदाजीतील फ्लॉप शो! केएल राहुल अक्षरसह नितीश कुमारनं सावरलं
नाणेफेक गमाल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. संघाच्या धावफलकावर अवघ्या १३ धावा असताना रोहित शर्माच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. तो १४ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने ८ धावा करून तंबूत परतला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या विराट कोहलीला ८ चेंडूचा सामना करूनही खाते उघडता आले नाही. कर्णधार शुबमन गिल १० धावा करून परतल्यावर सर्वांच्या नजरा या उप कर्णधार श्रेयस अय्यरवर खिळल्या हो्या. पण तो देखील ११ धावांवर तंबूत परतला. संघ अडचणीत असताना षटके कमी करण्यात आल्यावर अक्षर पटेल आणि लोकेश राहुल जोडी जमली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी रचली. अक्षर पटेलनं ३१ चेंडूत ३१ धावा केल्या. लोकेश रुहल ३१ चेंडूत ३८ धावा करून परतल्यावर नितीश कुमार रेड्डीनं ११ चेंडूत नाबाद १९ धावा करत २६ षटकात भारतीय संघाच्या धावफलकावर १३६ धावा लावल्या.
ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शनं लुटली मैफिल
डकवर्थ लुईस नियमानुसार, ऑस्ट्रेलियन संघाला १३१ धावांचे टार्गेट मिळलं होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना ट्रॅविस हेड आणि ८(५) आणि मॅथ्यू शॉर्ट ८ (१७) स्वस्ता माघारी फिरले. पण त्यानंतर सलामीला बॅटिंगला आलेल्या मिचेल मार्शनं आधी जोश फिलिप ३७ (२९) सोबत उत्तम भागीदारी करत सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं सेट केला. त्यानंतर मॅथ्यू रॅनशोसोबत २१ (२४)* मॅच संपवूनच तो नाबाद राहिला. मार्शनं ५२ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४६ धावांची नाबाद खेळी केली.