Join us

‘...तर स्मिथ, वॉर्नरचा विरोध झाला असता’

स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर हे एका वर्षाच्या बंदीमुळे भारताविरुद्ध घरच्या कसोटी मालिकेत खेळू शकणार नसल्यामुळे आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल हे खुश आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 01:43 IST

Open in App

मुंबई : स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर हे एका वर्षाच्या बंदीमुळे भारताविरुद्ध घरच्या कसोटी मालिकेत खेळू शकणार नसल्यामुळे आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल हे खुश आहेत. जर हे दोघे खेळले असते, तर प्रेक्षकांनी त्यांचा विरोध केला असता, असे चॅपेल यांना वाटते.माजी कर्णधार स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी मालिकेत चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर क्रिकेट आॅस्ट्रेलियाने एका वर्षाची बंदी लादली होती. भारतीय संघ नोव्हेंबरच्या अखेरीस आॅस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. (वृत्तसंस्था)