Join us  

धोनीला संघात पुनरागमन करायचे असेल तर 'ही' गोष्ट करावी लागेल, सांगतायत निवड समिती अध्यक्ष प्रसाद

न्यूझीलंडच्या दौऱ्यात धोनी पुनरागमन करू शकतो, असे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 10:37 PM

Open in App
ठळक मुद्देन्यूझीलंडच्या दौऱ्यात हार्दिक पंड्या पुनरागमन करणार असल्याचे संकेत प्रसाद यांनी दिले आहेत.

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या क्रिकेटपासून लांब आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण धोनीला जर भारतीय संघात पुनरागमन करायचे असेल, तर त्याला एक गोष्ट करावी लागेल, असे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.

न्यूझीलंडच्या दौऱ्यात धोनी पुनरागमन करू शकतो, असे म्हटले जात आहे. या दौऱ्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पुनरागमन करणार असल्याचे संकेत प्रसाद यांनी दिले आहेत. पण त्याचबरोबर धोनीच्या पुनरागमन करण्यातबाबतही त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

प्रसाद म्हणाले की, " हार्दिक सध्याच्या घडीला दुखापतीमधून सावरत आहे. न्यूझीलंडच्या दौऱ्याला २४ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे हार्दिकबाबतचा निर्णय आम्ही जानोवारीच्या तिसऱ्या आठवड्यात घेणार आहोत."

धोनीबाबत प्रसाद म्हणाले की, " धोनीच्या पुनरागमनाबाबत मी कोणतेही भाष्य करू इच्छित नाही. धोनीला जर भारतीय संघात पुनरागमन करायचे असेल तर त्याने स्थानिक सामन्यांमध्ये खेळायला हवे."

रिषभ पंत ठरतोय सतत फ्लॉप, बीसीसीआय घेणार मोठा निर्णयमुंबई : भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत हा सतत फ्लॉप ठरताना दिसत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने तब्बल तीन झेल सोडले. त्याचबरोबर पंतला फक्त सात धावाच करता आल्या. संघाला गरज असताना पंतला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आता बीसीसीआयने पंतबाबत एक मोठा निर्णय घेण्याचे ठरवले आहे.

आज श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला. या दोन्ही संघात पंतला स्थान देण्यात आले आहे. पण ही संधी देत असताना पंतबाबत बीसीसीआयने मोठा निर्णयही घेतला आहे. भारताचे निवड समिती अध्यक्ष यांनी संघ निवड केल्यानंतर ही गोष्ट सांगितली.

प्रसाद म्हणाले की, " पंतचे यष्टीरक्षण चांगले होताना दिसत नाही. गेल्या काही सामन्यांमध्ये तो अपयशी ठरलेला आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीत सुधारणा व्हावी, असे आम्हाला वाटते. त्यासाठी पंतसाठी एक खास प्रशिक्षक नेमण्यात येईल. यासाठी बीसीसीआयदेखील सकारात्मक आहे आणि हा मोठा निर्णय ते घेऊ शकतील."

सतत नापास होऊनही रिषभ पंतवर निवड समितीची मेहेरबानी, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात स्थानवेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने तब्बल तीन झेल सोडले. त्यानंतर चाहत्यांनी पंतला ट्रोल करत त्याला निवृत्तही केले. पण दुसरीकडे भारतीय निवड समिती पंतवर चांगलीच मेहेरबान होताना दिसत आहे. सातत्याने अपयशी ठरल्यावरसुद्धा पंतला संघात कायम ठेवण्यात आले आहे.

भारत श्रीलंकेबरोबर तीन ट्वेन्टी-२० आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाबरोबर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्ही संघात पंतला संघात स्थान देण्यात आले आहे. पंतच्या निवडीमुळे चाहत्यांमध्ये रोष पाहायला मिळत आहे.

भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहचे ट्वेंटी-20 आणि वन डे संघात पुनरागमन झाले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन ट्वेंटी-20 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 वन डे सामन्यांसाठी बीसीसीआयनं सोमवारी संघ जाहीर केला. रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर शिखर धवनची ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेत वापसी झाली आहे. रोहित व शमी ट्वेंटी-20 मालिकेत खेळणार नाही.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीहार्दिक पांड्या