Join us  

मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळलो तर फाशी द्या - मोहम्मद शामी

शामीने देशाला धोका दिल्याचे हसीनने वक्तव्य केले होते. त्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शामीची बाजू मांडली होती. शामी हा कधीही देशाला धोका देऊ शकत नाही, असे वक्तव्य धोनीने केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 2:57 PM

Open in App
ठळक मुद्देभारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीची बीसीसीआय आता मॅच फिक्सिंग संदर्भात चौकशी करणार आहे.

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीची बीसीसीआय आता मॅच फिक्सिंग संदर्भात चौकशी करणार आहे. याबाबत शामीला विचारल्यावर त्याने ' मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळलो तर फाशी द्या' अशी भूमिका घेतली आहे.

शामीने देशाला धोका दिल्याचे हसीनने वक्तव्य केले होते. त्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शामीची बाजू मांडली होती. शामी हा कधीही देशाला धोका देऊ शकत नाही, असे वक्तव्य धोनीने केले होते. पण हसीनने आरोप केल्यावर बीसीसीआयने ते गंभीरपणे घेतले आहेत. वार्षिक करारामध्येही बीसीसीआयने शामीला वगळले आहे. आता त्याची मॅच फिक्सिंगच्या आरोपांखाली चौकशी करण्यात येणार आहे.

 शामीची पत्नी हसीन जहाँ हिने शमीचे फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपवरील चॅटिंगचे स्क्रीनशॉट शेअर करून त्याच्यावर हे आरोप केले आहेत.  दरम्यान या प्रकारामुळे शामीचे वैवाहिक जीवन धोक्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सोशल मीडियावर शामीचे काही तरुणींसोबतचे फोटो  पोस्ट करण्यात आले आहेत. त्या तरुणी शामीच्या गर्लफ्रेंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यासोबतच्या अश्लील चॅटिंगचे स्क्रीनशॉटही शेअर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानमधील प्रेयसीकडून शामी पैसे घेतो आणि देशाला धोका देत आहे, असेही हसीनने सांगितले होते.

" भारताकडून खेळणे हे माझे स्वप्न होते. त्यामुळे देशाकडून खेळाताना मला नेहमीच अभिमान वाटला आहे. त्यामुळे माझ्यावर जे मॅच फिक्सिंगचे आरोप केले जात आहेत ते बिनबुडाचे आहेत. त्यामुळे जर मी याप्रकरणात दोषी आढळलो तर मला फाशी द्या," असे शामी म्हणाला आहे.

टॅग्स :मोहम्मद शामीबीसीसीआय