आयसीसीचा निर्णय योग्यच

अख्तरने या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 11:13 PM2020-07-24T23:13:29+5:302020-07-24T23:14:22+5:30

whatsapp join usJoin us
The ICC's decision is correct | आयसीसीचा निर्णय योग्यच

आयसीसीचा निर्णय योग्यच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला नेमक्या कोणत्या गोष्टीचा इतका राग आहे, ते कळत नाही. त्याने सध्या एका वादग्रस्त विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.‘आयसीसीने टी-२० विश्वचषक स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या दबावाखाली घेतला. आयपीएलसाठी टी-२० विश्वचषक रद्द केला’असे वक्तव्य त्याने नुकतेच केले.

आयपीएल व्हावी अशी सर्वांचीच इच्छा आहे. २-३ महिन्यापासून आयपीएल आयोजनासाठीच प्रयत्न होत असल्याचे आपण पाहिले. पण आयपीएलसाठी विश्वचषक स्पर्धा रद्द व्हावी अशी बीसीसीआयची भूमिका कधीच नव्हती. कोरोनामुळे आलेल्या अडचणीनंतर एक कालावधी असा मिळाला, ज्यामध्ये आयपीएल किंवा टी-२० विश्वचषक स्पर्धेपैकी एकच स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सध्या कोणती स्पर्धा महत्त्वाची आहे, याचा विचार करूनच आयसीसीने विश्वचषक स्पर्धा स्थगित करून आयपीएल आयोजनाचा मार्ग मोकळा केला. अख्तरने या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला.

बाकीचे क्रिकेट बोर्ड आणि खास करून क्रिकेट आॅस्टेÑलिया यांना कोरोनामुळे मोठा आर्थिक फटका बसला. यातून सावरण्यासाठी त्यांनी अधिकृतपणे सांगितले की, टी-२० विश्वचषक स्पर्धेऐवजी आयपीएल खेळविण्यावर भर द्यावा. माझ्या मते हा निर्णय यामुळेच घेण्यात आला. शिवाय वेळेचीही कमतरता होती. कमी कालावधीत १६ संघांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणे सहजसोपी गोष्ट नाही. अडचणींमध्येही जर आयपीएल आयोजनाची संधी मिळत असेल, तर का ही स्पर्धा खेळवली जाऊ नये? आर्थिकदृष्ट्या विचार केल्यास आयपीएलमधून नक्कीच मोठा लाभ होईल.

अख्तरच्या वक्तव्याबाबत म्हणायचे झाल्यास, बीसीसीआय श्रीमंत क्रिकेट संघटना असून सर्वाधिक क्रिकेट चाहते, सर्वांत मोठी स्पर्धा भारतात आहे. या गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. प्रत्येक देशाच्या क्रिकेट बोर्डाला आयपीएलमधून लाभ होईल. अप्रत्यक्षरीत्या पीसीबीलाही फायदा होऊ शकतो. आयसीसीला मिळणाऱ्या वाटातून पाकला मदत मिळू शकते. एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, एका सत्रातून सुमारे ४ हजार कोटी रुपयांची कमाई करून देणाºया आयपीएल स्पर्धेकडे दुर्लक्ष कसे करता येईल?

Web Title: The ICC's decision is correct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ICCआयसीसी