Join us  

ICC World Twenty20 Semi Final 2: मिताली राजला न खेळवणं भारताला पडलं महागात? इंग्लंडसमोर 113 धावांचं माफक आव्हान  

आयसीसी ट्वेंटी-20 महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला अनुभवी मिताली राज हिची उणीव जाणवली. भारतीय महिलांना इंग्लंड समोर मोठे लक्ष्य उभे करण्यात अपयश आले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 6:54 AM

Open in App

ॲंटिग्वा: आयसीसी ट्वेंटी-20 महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला अनुभवी मिताली राज हिची उणीव जाणवली. भारतीय महिलांना इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य उभे करण्यात अपयश आले.  या सामन्यात त्यांना 19.3 षटकांत केवळ112 धावा करता आल्या. 

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. चेंडूला गती आणि वळण मिळणाऱ्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजीचा निर्णय काहीसा बुचकळ्यात टाकणारा होता. मात्र, स्मृती मानधना आणि तानिया भाटिया यांनी संघाला सकारात्मक सुरुवात करून दिली. महत्त्वाच्या सामन्यात अनुभवी खेळाडू मिताली राजचे नसणे खटकणारे होते. हरमनप्रीतने विजयी संघच कायम राखण्याचा निर्णय घेतला. 

इंग्लंडच्या गोलंदाजीचा सामना करताना सुरुवातीला भारतीय फलंदाज चाचपडले. परंतु मानधनाने सर्व दडपण कमी करताना फटकेबाजी केली. मानधना 23 चेंडूंत 34 धावा करून सोपा झेल देत माघारी फिरली. त्यापाठोपाठ भाटियाही ( ११) बाद झाली. भारताने दहा षटकांत 2 बाद 59 धावा केल्या होत्या.

 हरमनप्रीत आणि जेमिमा रॉड्रिग्जला खुलून खेळता येत नव्हते. म्हणून त्यांनी सुरुवातीला खेळपट्टीवर जम बसवण्यासाठी सावध खेळ केला नंतर फटकेबाजी केली. पण ही भागीदारी 36 धावांर संपुष्टात आली. जेमिमा धावबाद झाली. 15 षटकांत भारताच्या 3 बाद 93 धावा झाल्या होत्या कर्स्टी गॉर्डनने 16 व्या षटकात भारताला दोन धक्के दिले. त्यानंतर भारतीय संघाची पडझड सुरुच राहिली. 93 ते 99 या धावांत भारताचे चार फलंदाज बाद झाले.

टॅग्स :आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप