ICC World T20: भारत-पाकिस्तान 'हाय व्होल्टेज' सामना 11 नोव्हेंबरला

ICC World Twenty20: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा दोन्ही देशांतील चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय... कोण बाजी मारणार, कोणता फलंदाज चमकणार, कोणता गोलंदाज चमकणार यावर पैजा लागतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 10:45 AM2018-11-06T10:45:23+5:302018-11-06T10:45:42+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Twenty20: India-Pakistan High Voltage match will be played on November 11 | ICC World T20: भारत-पाकिस्तान 'हाय व्होल्टेज' सामना 11 नोव्हेंबरला

ICC World T20: भारत-पाकिस्तान 'हाय व्होल्टेज' सामना 11 नोव्हेंबरला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा दोन्ही देशांतील चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय... कोण बाजी मारणार, कोणता फलंदाज चमकणार, कोणता गोलंदाज चमकणार यावर पैजा लागतात. ही संधी पुन्हा दोन्ही देशांतील क्रिकेटवेड्या चाहत्यांना मिळणार आहे. 9 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या महिलांच्या ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा वेस्ट इंडिज येथे खेळवण्यात येणार आहे. 
या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर येणार आहे. बीसीसीआयने केलेल्या ट्विटनुसार 11 नोव्हेंबरला भारत-पाक सामना गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघाचा ब गटात समावेश करण्यात आला असून त्यांच्यासमोर पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आयर्लंड यांचे आव्हान असणार आहे. 



हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न पाहत आहे. भारतीय महिलांनी सराव सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडिज संघाला पराभवाची चव चाखवली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंचे मनोबलची उंचावले आहे. 

Web Title: ICC World Twenty20: India-Pakistan High Voltage match will be played on November 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.