Join us  

ICC World Twenty20 : मिताली राजला वगळल्याचा पश्चाताप नाही, हरमनप्रीत कौरचे स्पष्टीकरण

ICC World Twenty20 :आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 1:15 PM

Open in App
ठळक मुद्देभारतीय महिला संघाचा उपांत्य फेरीत पराभवइंग्लंडने 8 विकेट राखून मिळवला विजयमिताली राजची अनुपस्थिती जाणवली

अँटीग्वा : आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. इंग्लंडच्या महिला संघाने 2017च्या वन डे वर्ल्ड कप प्रमाणे याही स्पर्धेत भारताची घोडदौड रोखली. प्रथम फलंदाजी करताना भारताचा संपूर्ण संघ 112 धावांवर माघारी परतला. सुरुवातीला झटके बसूनही इंग्लंडच्या खेळाडूंनी संयमी खेळी करताना 8 विकेट राखून विजय मिळवला. त्यामुळे दहा वर्षांनंतर ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या भारताचे आव्हान संपुष्टात आले. या सामन्यात अनुभवी मिताली राजला न खेळवल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आणि पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरच्या निर्णयावार टीका होऊ लागली. मात्र, बिनधास्त हरमनप्रीतने या निर्णयाचा पश्चाताप नसल्याचे उत्तर दिले.

( ICC World Twenty20 Semi Final 2 : भारताला इंग्लिश पेपर कठीण; उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात) सामन्यानंतर हरमनप्रीत म्हणाली, " आम्ही जो काही निर्णय घेतला, तो संघाच्या भल्यासाठी घेतला. त्यामुळे काहीवेळा ते निर्णय यशस्वी होतात, तर काही वेळा फसतात. त्यामुळे आजच्या निर्णयाचा पश्चाताप नाही. संपूर्ण स्पर्धेत ज्या पद्धतीने खेळलो, त्यावरून प्रत्येक खेळाडूचा अभिमान वाटतो. आमचा संघ युवा खेळाडूंनी भरलेला आहे आणि आजचा पराभव आम्हाला शिकवण देणारा ठरला. काहीवेळा तुम्हाला खेळपट्टीनुसार स्वतःच्या खेळात बदल करावा लागतो.''हरमनप्रीतने इंग्लंडच्या गोलंदाजांचे कौतुक केलं. ''इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी केली. या लक्ष्याचा पाठलाग करणं सोपी गोष्ट नव्हती. आमच्या गोलंदाजांनीही चांगला खेळ केला. त्यांनी 18व्या षटकापर्यंत सामना नेला. आमचा हा युवा संघ आहे आणि मनोधैर्य वाढवण्याची आवश्यकता आहे. तणावाच्या स्थितीत खेळ कसा करावा, हे शिकायला हवं,'' असं हरमनप्रीतने सांगितले.   

टॅग्स :आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारतीय महिला क्रिकेट संघ