Join us  

आयसीसीचा विश्वचषकातील ‘चौकार’ नियम वेडेपणाचा!

हा नियम खुळचट असून, त्याला न्याय आणि तर्काचा आधार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 12:34 AM

Open in App

अयाझ मेमन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : : ज्या प्रकारे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा निकाल देण्यात आला, त्या नियमावलीवर बोट ठेवण्यात आले. यावर चार्ल्स डिकन्सच्या सुविख्यात ‘आॅलिवर टिष्ट्वस्ट’ या कादंबरीतील मिस्टर बम्बल यांच्या अवलोकनात आले असते, तर त्यांनी जे उत्तर दिले, तेच येथे लागू होते. कायद्यानुसार त्यांच्या पत्नीने त्यांच्या निदर्शनाखालीकाम करावे, असे सांगण्यात आल्यावर ‘कायद्याला तेच वाटत असेल, तर कायदा गाढव आहे’ अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली.न्यूझीलंडला सर्वाधिक चौकारांच्या नियमांचा आधाराने विश्वविजेतेपदापासून दूर ठेवायची कृती याच सदरातील आहे. हा नियम खुळचट असून, त्याला न्याय आणि तर्काचा आधार नाही. त्याचे त्वरित उच्चाटन व्हायला हवे. योग्य निकालासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा समितीने प्रयत्न करायला हवेत. चाहत्यांचा विचार करीत जसा कसोटी क्रिकेटमध्ये ‘अनिर्णित’ निकाल असतो, तसाचा नियम एकदिवसीय क्रिकेटमध्ये असायला हवा. सामना बरोबरीवर राहिल्यास विश्वचषकात पहिल्यांदाच सुपर ओव्हरवरून निकाल देण्याचे ठरले. हा आयसीसीने केलेला बदल उत्तम आहे. मात्र, सुपर ओव्हरनंतर उद्भवलेल्या स्थितीवर विजेता घोषित करण्याचा योग्य विचार व्हायला हवा. ज्या नियमाला लागू करण्यात आले, त्याची योग्यता का नाही? याचे विश्लेषण केल्यास बऱ्याच गोष्टी पुढे येतील.खेळाच्या एका निष्कर्षावर विजेता घोषित करणे हे विचाराधीनच नव्हे, तर ते खेळाच्या प्रतिष्ठेवरसुद्धा हल्ला करते, जे सर्व खेळाडू, त्यांची कुशलता आणि विशेषत: या गुणांसाठी महत्त्वपूर्ण असते. समान धावसंख्या असते, तेव्हा षटकार आणि चौकारांना महत्त्व का? एकेरी आणि दुहेरी धावसंख्या का नाही, एकदिवसीय क्रिकेटमध्ये बळी आणि निर्धाव षटकांना महत्त्व का नाही? अंतिम सामना शानदार बनविण्यात दोन्ही संघांचा वाटा आहे., पण असा नियम नसता, तर चषक इंग्लंडकडे नसता हेही खरेच. दोन्ही संघ संयुक्त विजेते असते, तर अधिक न्याययुक्त ठरले असते.कन्सल्टिंग एडिटर लोकमत

टॅग्स :वर्ल्ड कप 2019इंग्लंड