Join us  

ICC World Cup 2019: न्यूझीलंडविरुद्ध विंडिजची निर्णायक लढत

वेस्ट इंडिज संघ सुरुवातीच्या दमदार कामगिरीनंतर विश्वचषकात कामगिरी सातत्य राखण्यात अपयशी ठरला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 1:53 AM

Open in App

मँचेस्टर : वेस्ट इंडिज संघ सुरुवातीच्या दमदार कामगिरीनंतर विश्वचषकात कामगिरी सातत्य राखण्यात अपयशी ठरला आहे. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध शनिवारी त्यांचा सामना ‘करा किंवा मरा’ असाच असेल. विंडीजने पाकवर सात गड्यांनी मात केल्यानंतर सतत पराभवाचे तोंड पाहिले आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्ध पराभव पत्करावा लागला, तर द. आफ्रिकेविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाली होती. हा संघ ३ गुणांसह सातव्या स्थानी आहे. उपांत्य फेरीसाठी विंडीजला पुढील सर्वच सामने जिंकावे लागतील.बांगलादेशविरुद्ध मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही विंडीज संघ पराभूत झाला होता. ख्रिस गेलचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी धावा तर काढल्या, पण गोलंदाजी हा संघाच्या चिंतेचा विषय आहे. संघाला विजय मिळवून द्यायचा झाल्यास एविन लेविस, शाय होप, शिरमोन हेटमायर व जेसन होल्डर, गेल, आंद्रे रसेल, शेल्डन गॅब्रियल, ओशेन थॉमस तसेच शेनन गॅब्रियल यांना फलंदाजी व गोलंदाजीत योगदान द्यावे लागेल.न्यूझीलंडने पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. भारताविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि द. आफ्रिकेला पराभूत करणाऱ्या न्यूझीलंडची खरी परीक्षा आता विंडीज, पाक, ऑस्ट्रेलिया तसेच इंग्लंडविरुद्ध होणार आहे. (वृत्तसंस्था)हेड-टू-हेडदोन्ही संघांदरम्यान सन १९७५ पासून आतापर्यंत ६४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने झाले असून त्यापैकी वेस्ट इंडिजने ३० सामने, तर न्यूझीलंडने २७ सामने जिंकले आहेत. सात सामने अनिर्णित राहिले आहेत.दोन्ही संघांमधील शेवटच्या पाच लढतीमधील ४ सामने न्यूझीलंडने, तर एका सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवला आहे.विश्वचषकामध्ये १९७५ पासून दोन्ही संघ आतापर्यंत सातवेळा आमनेसामने आले असून यातील ४ सामन्यांत न्यूझीलंडने, तर तीन सामन्यांत विंडीजने मारली आहे.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019वेस्ट इंडिजन्यूझीलंड