Join us  

ICC World Cup 2019 : टीम इंडियाकडून झालेला पराभव जिव्हारी; पाक संघावर बंदी घालण्यासाठी याचिका

ICC World Cup 2019 :भारताकडून झालेला मानहानिकारक पराभव हा पाकिस्तान चाहत्याच्या चागंलाच जिव्हारी लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 11:27 AM

Open in App

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारताकडून झालेला मानहानिकारक पराभव हा पाकिस्तान चाहत्याच्या चागंलाच जिव्हारी लागला आहे. भारताने वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका कायम राखला. भारताने सातव्यांदा पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली. रविवारी मँचेस्ट येथे झालेल्या लढतीत डकवर्थ लुईस नियमानुसार भारतानं 89 धावांनी विजय मिळवला. सामन्यानंतर पाकिस्तानचे अनेक चाहते मैदानाबाहेर रडत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, आता तर एका चाहत्याने चक्क न्यायालयात धाव घेतली आहे.  पाकिस्तानच्या संपूर्ण संघावर बंदी घालण्यात यावी, शिवाय निवड समितीलाही बरखास्त करण्यात यावं अशी मागणीची याचिका चाहत्यानं गुर्जनवाला न्यायालयात दाखल केली आहे.

भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूंना टीकेचा सामना करावा लागत आहे. पाच सामन्यानंतर त्यांच्या खात्यात केवळ तीनच गुण जमा झाले आहेत आणि ते नवव्या स्थानावर आहेत.  याचिकाकर्त्याच्या मागणीची दखल घेत न्यायालयानेही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. येथील जिओ न्यूजनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डनेही संघात व संघ व्यवस्थापनात मोठे बदल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्या या बदलाचा पहिला फटका प्रशिक्षक मिकी आर्थर यांना बसणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्याशिवाय संघ व्यवस्थापक टालत अली, गोलंदाजी प्रशिक्षक अझर महमूद आणि संपूर्ण निवड समितीला बरखास्त करण्यात येणार आहे.

भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तामध्ये जायला घाबरतोय कर्णधार सर्फराझभारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तानचे खेळाडू चांगलेच धास्तावले आहेत. कारण आता त्यांना पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी भिती वाटत आहे. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमदने तर एका प्रसारमाध्यमापुढे या गोष्टीची कबुली दिली आहे.

भारताविरुद्धच्या सामन्यानंतर  ‘द न्यूज डॉट कॉम डॉट पीके’ या संकेतस्थळाला मुलाखत देताना सर्फराझ म्हणाला की, " जर कुणी असा विचार करत असेल, की मी पाकिस्तानमध्ये जाईन, तर ते चुकीचे ठरेल. कारण जर काही विपरीत घडणार असेल, तर मी का पाकिस्तानमध्ये जायचे. पराभव विसरून अन्य चार सामन्यांमध्ये आम्हाला चांगले प्रदर्शन करावे लागेल." 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारत विरुद्ध पाकिस्तानपाकिस्तान