Join us  

ICC World Cup 2019: धवन पाठोपाठ भुवनेश्वरचीही विकेट पडणार? इंग्लंडमध्ये पोहोचला 'हा' गोलंदाज

सोमवारी हा गोलंदाज इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 6:28 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाता येत्या काही दिवसांत दुसरा मोठा धक्का बसू शकतो. यापूर्वी सलामीवीर शिखर धवनच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला आहे. आता स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या रुपता भारताला दुसरा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. कारण भुवनेश्वरच्या जागी भारतीय संघाने एका गोलंदाजाचा विचार सुरु केला आहे. सोमवारी हा गोलंदाज इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे.

भारताचा स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे माघारी परतला होता. पण त्याची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे भुवनेश्वर कुमारला या सामन्याला मुकावे लागले होते. भुवनेश्वरने दुखापतीपूर्वी २.४ षटके टाकली होती. त्यानंतर त्याचे उर्वरीत दोन चेंडू विजय शंकरने टाकले होते. 

भारतीय संघ भुवनेश्वरबाबत काही अपडेट देणार होता. पण भारतीय संघ व्यवस्थापनाने भुवनेश्वरच्या दुखापतीबाबत आतापर्यंत कोणतेही अपटेड दिलेली नाही. त्यामुळे भुवनेश्वरच्या दुखापतीचे नेमके स्वरुप काय, याबाबत चाहत्यांना काही माहिती नाही. भारतीय संघ व्यवस्थापनाने आता भुवनेश्वरच्या जागी एका गोलंदाजाला इंग्लंडमध्ये बोलावले होते.

भारत आणि वेस्ट इंडिज यांचा 27 जूनला सामना होणार आहे. यापूर्वी बीसीसीआयला भुवनेश्वरऐवजी एक गोलंदाज हवा आहे. कारण भुवनेश्वर सध्याच्या घडीला नेट्समध्येही गोलंदाजी करताना दिसत नाही. त्यामुळे बीसीसीआयने एका भारतातील एका गोलंदाजाला आता इंग्लंडमध्ये बोलावले होते. सोमवारी हा गोलंदाज भारतीय संघात दाखल झाला आहे.

इंग्लंडमध्ये दाखल झालेला हा गोलंदाज नेमका कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आयपीएलमध्ये आरसीबी या संघातून नवदीप सैनी हा गोलंदाज खेळला होता. बीसीसीआयने त्याला इंग्लंडमध्ये बोलावून घेतले असून तो सोमवारी दाखलही झाला आहे. 

याबाबत बीसीसीआयने म्हटले आहे की, " नवदीप सैनी हा एकमेव गोलंदाज आहे, जो भारतीय संघाबरोबर कायम राहणार आहे. सैनी हा भारतीय संघाबरोबर नेट्मध्ये सराव करणार आहे. दीपक चहर आणि आवेश खान हे दोघेही भारतीय संघाबरोबर सध्या सराव करत आहेत. पण खलील अहमदला मात्र भारतात पाठवण्यात आले आहे."

टॅग्स :भुवनेश्वर कुमारवर्ल्ड कप 2019