ललित झांबरे, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा डाव वेस्ट इंडिजने आज २१.४ षटकातच १०५ धावांमध्ये गुंडाळला. पाकिस्तानला आपल्या वाट्याच्या ५० पैकी निम्मीसुद्धा षटके खेळून काढता आली नाहीत. मात्र पाकिस्तानसाठी ही काही नवी गोष्ट नाही. आज २१.४ षटकात ते बाद झाले पण याआधी याच्यापेक्षाही कमी षटकात ते बाद झाले आहेत आणि योगायोगाने वेस्टइंडिजनेच त्यावेळीसुध्दा त्यांचा फडशा पाडला होता. १९९३ च्या केपटाऊन येथील सामन्यात विंडीजने पाकिस्तानचा डाव फक्त १९.५ षटकात आणि अवघ्या ४३ धावांतच संपविला होता. त्या तुलनेत आजच्या १०५ धावा आणि २१.४ षटके बरीच म्हणायची.
![]()
विश्वचषक सामन्यात सर्वात कमी षटकांमध्ये बाद झालेल्या संघांमध्ये पाकिस्तान सहाव्या क्रमांकावर आहे. एकूण विश्वचषक स्पर्धेत ९ डावात फलंदाजी करणारे संघ निम्म्यापेक्षाही कमी षटकात बाद झाले आहेत. अर्थात हे सर्वच सामने या संघांनी गमावले. या ९ डावांचा तपशील असा..
षटकं संघ धावा विरुद्ध वर्ष
१४.० नामिबिया ४५ आस्ट्रेलिया २००३
१७.४ नामिबिया ८४ पाकिस्तान २००३
१८.४ कॅनडा ३६ श्रीलंका २००३
१८.५ बांगला ५८ वेस्ट इंडिज २०११
१९.१ झिम्बाब्वे ९९ पाकिस्तान २००७
२१.४ पाकिस्तान १०५ वेस्ट इंडिज २०१९
२३.० श्रीलंका १०९ भारत २००३
२३.५ केनिया ६९ न्यूझीलंड २०११
२४.४ बर्म्युडा ७८ श्रीलंका २००७
पाकिस्तानी संघ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५ पेक्षा कमी षटकात बाद होण्याची ही पाचवी वेळ ठरली. वेस्ट इंडिजविरुध्द तिसºयांदा त्यांच्यावर ही नामुष्की ओढवली आहे. हे सर्व सामने अर्थातच पाकिस्तानने गमावले. पाकिस्तानी संघ झटपट गुंडाळले गेलेले हे पाच डाव पुढीलप्रमाणे -
षटकं धावा विरुद्ध ठिकाण वर्ष
१९.५ ४३ वेस्ट इंडिज केपटाऊन १९९३
२१.४ १०५ वेस्ट इंडिज नॉटिंगहॅम २०१९
२२.५ ७५ श्रीलंका लाहोर २००९
२३.४ ७१ वेस्ट इंडिज ब्रिस्बेन १९९३
२५.० ८९ द.आफ्रिका मोहाली २००६