ICC World Cup 2019 : विराट कोहलीने घेतली इंग्लंडच्या राणीची भेट

विश्वचषकाच्या पूर्वसंध्येला भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडच्या राणीची भेट घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 10:47 PM2019-05-29T22:47:31+5:302019-05-29T22:48:29+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: Virat Kohli meet the Queen of England | ICC World Cup 2019 : विराट कोहलीने घेतली इंग्लंडच्या राणीची भेट

ICC World Cup 2019 : विराट कोहलीने घेतली इंग्लंडच्या राणीची भेट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : विश्वचषकाच्या पूर्वसंध्येला भारताचा कर्णधार विराट कोहलीनेइंग्लंडच्या राणीची भेट घेतली. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये इंग्लंडच्या राणीसोबत कोहली दिसत आहे. इंग्लंडच्या राणीची भेट घ्यायला कोहलीबरोबर यजमान संघाचा कर्णधार इऑन मॉर्गनही होता. विश्वचषकातील सर्व संघातील कर्णधारांना यावेळी इंग्लंडच्या राणीने आमंत्रित केले होते.




 

आतापर्यंत एकदाही वर्ल्डकप जिंकू न शकलेल्या संघांमध्ये रंगणार पहिला सामना
विश्वचषकाचा पहिला सामना अशा दोन संघांमध्ये होत आहे की, ज्यांनी आतापर्यंत एकदाही वर्ल्डकप जिंकलेला नाही. क्रिकेट हा खेळ विश्वाला ज्यांनी शिकवला तो इंग्लंडचा संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे. पण आतापर्यंत या दोन्ही देशांना एकदाही वर्ल्डकप जिंकता आलेला नाही.

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यांमध्ये आतापर्यंत 59 सामने खेळवले गेले आहेत. यापैकी 29 सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत, तर इंग्लंडला 26 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहेत. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एक सामना बरोबरीत सुटला आहे, तर तीन सामन्यांचे निकाल लागलेले नाहीत.


दोन्ही संघ पुढील प्रमाणे : 
इंग्लंड: इऑन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), मोइन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, टॉम कुरन, लायम डॉसन, लायम प्लंकेट, आदिल राशिद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, जेम्स विंस, ख्रिस वोक्स, मार्क वुड.

दक्षिण आफ्रिका :फॅफ ड्यू प्लेसिस (कर्णधार), ऐडन मार्करम, क्विंटन डि कॉक (विकेटकीपर), हाशिम अमला, रासी वेन डर डुंसा, डेव्हिड मिलर, ऐंडिल फेहलुकवायो, जेपी ड्यूमिनी, डेव्हन प्रेटोरियस, डेल स्टेन, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्त्जे, इमरान ताहिर, तबरेज शम्सी.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचा 'स्पेशल' संघ 
उद्यापासून वर्ल्डकपला सुरुवात होत आहे. पण भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा संघ नेमका कसा असेल. कोणत्या खेळाडूला पहिल्या सामन्यात संधी मिळेल, याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचा 'स्पेशल' संघ निवडला गेला आहे.

भारताने आतापैकी दोन सराव सामने खेळले. पहिल्या सराव सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराबव पत्करावा लागला. पण दुसऱ्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशला पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी आणि लोकेश राहुल यांच्या शतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना साडे तिनशे धावांचा पल्ला पार केला होता. त्यामुळे आता भारताच्या संघात कोणाल स्थान मिळेल, हे पाहावे लागेल.

भारताचा व्हेरी व्हेरी स्पेशल माजी फलंदाज म्हणजे व्हीव्हीएस लक्ष्मण. सध्या लक्ष्मण समालोचन करत आहे आणि ही गोष्ट करताना त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी त्याने संघ निवडला आहे. 

हा पाहा लक्ष्मणने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी निवडलेला संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, एमएस धोनी , हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल.

Web Title: ICC World Cup 2019: Virat Kohli meet the Queen of England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.