Join us  

ICC World Cup 2019 : विराट कोहलीने दुखापत करून घेतली; भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला धक्का

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होऊन तीन दिवस झाले तरीही भारतात क्रिकेटमय वातावरण अजून हवं तसं निर्माण झालेलं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 2:43 PM

Open in App

साउदॅम्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होऊन तीन दिवस झाले तरीही भारतात क्रिकेटमय वातावरण अजून हवं तसं निर्माण झालेलं नाही. जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांत आघाडीवर असलेल्या भारतीय संघाचा पहिला सामना येत्या बुधवारी होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. या सामन्यात भारतच बाजी मारेल असा सर्वांना विश्वास आहे,परंतु त्याला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्णधार कोहलीनं सराव सत्रात अंगठ्याला दुखापत करून घेतली आहे आणि त्याची ही दुखापत तीन दिवसात बरी न झाल्यास त्याला पहिल्या सामन्याला मुकावे लागेल. पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ साउदॅम्पटन येथे दाखल झाला आणि खेळाडूंनी सरावाचा श्री गणेश: केला. पण शनिवारी सराव सत्रात कोहलीच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्याने सराव सत्रातूनही माघार घेतली आणि पुन्हा तो परतला नाही. संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांनी कोहलीला प्रार्थमिक उपचार दिले. 

अंगठ्याबर थंड पाण्याची पिशवी ठेवून कोहली ड्रेसिंग रुममध्ये परतला. भारतीय संघाची जबाबदारी पूर्णत: कोहलीच्या खांद्यावर आहे आणि त्याची दुखापत गंभीर असल्यास भारताला मोठा धक्का बसू शकतो. भारतीय संघाला पहिल्या सराव सामन्याय न्यूझीलंडकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता, परंतु त्यांनी बांगलादेशविरुद्ध दमदार पुनरागमन केले. लोकेश राहुल व महेंद्रसिंग धोनी यांनी शतकी खेळी साकारली.

 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019विराट कोहलीबीसीसीआय