Join us  

ICC World Cup 2019: विराटचा युवा संघ 2008 मध्ये  जिंकला होता, आता काय होणार?

विराट कोहली व केन विल्यम्सन यांना 11 वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देणाराही हा सामना असणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2019 5:07 PM

Open in App

ललित झांबरे, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडचे संघ प्रत्येकी सातव्यांदा उपांत्य फेरीत पोहाचले आहेत. मात्र या दोन संघांदरम्यान पहिल्यांदाच उपांत्य सामना खेळला जाणार आहे. त्याअर्थाने मंगळवारचा सामना तर विशेष असणारच आहे, शिवाय विराट कोहली व केन विल्यम्सन यांना 11 वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देणाराही हा सामना असणार आहे.

11 वर्षांपूर्वी म्हणजे 2008 मध्ये 19 वर्षाआतील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यातही भारत- न्यूझीलंड अशीच लढत झाली होती. त्यावेळी भारताने तीन गडी राखून विजय मिळवला होता. त्यावेळी न्यूझीलंडचा कर्णधार होता केन विल्यमसन आणि आपला कर्णधार होता विराट कोहली. आता हे दोघेही मोठे होवून मोठ्यांच्या संघांचे कर्णधार म्हणून पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांच्या त्यावेळच्या आठवणी जागणारच आहेत.

टॅग्स :विराट कोहलीकेन विलियम्सनवर्ल्ड कप 2019