Join us  

ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनीचे वर्ल्ड कप संघातील स्थान काय? रवी शास्त्रींनी दिलं उत्तर

ICC World Cup 2019 :इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ बुधवारी रवाना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 5:51 PM

Open in App

मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ बुधवारी रवाना होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. 2011नंतर प्रथमच वर्ल्ड कप उंचावण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. लंडनला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्य स्पर्धेपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याशी सराव सामना खेळणार आहे.  

महेंद्रसिंग धोनी हा भारताच्या वर्ल्ड कप संघातील सर्वात अनुभवी खेळाडी आहे. भारताच्या माजी कर्णधाराचे महत्त्व सांगताना शास्त्री म्हणाले,''त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र पालटण्याची धमक त्याच्यात आहे आणि अशा परिस्थितीत धोनीपेक्षा सरस खेळाडू कोणी असूच शकत नाही. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत तो भारताचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे.''  ते पुढे म्हणाले,''दोन सामन्यांमध्ये विश्रांतीसाठी पुरेसा वेळ आहे. त्यामुळे खेळाडू थकतील, असे मला वाटत नाही. जर आम्ही पूर्ण क्षमतेने खेळलो तर वर्ल्ड कप पुन्हा घरी आणण्यात यशस्वी ठरू. ही आव्हानात्मक स्पर्धा आहे. बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ 2015 च्या स्पर्धेपेक्षा अधिक आव्हानात्मक झाले आहेत.'' 

पाहा व्हिडीओ...5 जूनला भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल. 

टॅग्स :वर्ल्ड कप २०१९रवी शास्त्रीमहेंद्रसिंग धोनी