Join us  

ICC World Cup 2019 : भारतीय संघातील जागांसाठी चुरस, पंत वि. कार्तिक, चौथ्या स्थानावर कोणाला संधी?

ICC World Cup 2019 :आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी आपापले संघ जाहीर केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 11:03 AM

Open in App

मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. आज भारतीय संघाचीही घोषणा होणे अपेक्षित आहे. भारतीय संघात कोणाला संधी मिळणार? चौथ्या क्रमांकासाठी कोणाची वर्णी लागणार? महेंद्रसिंग धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणू कोण स्थान पटकावणार? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या डोक्यात प्रदक्षिण घालत आहेत. एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय निवड समिती या सर्व प्रश्नांची उत्तर आज देणार आहेत.  

 

संभाव्य अंतिम संघशिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

वरील अकरा खेळाडू हे वर्ल्ड कपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारच आहेत. फक्त चौथ्या क्रमांकासाठी महेंद्रसिंग धोनीला खेळवायचे की कॅप्टन कोहलीला एक स्थान खाली आणायचे, हा प्रश्न कायम राहतो. त्याशिवाय कुलदीप व युजवेंद्र या दोन फिरकीपटूंपैकी एकालाच संधी देऊन एक अतिरिक्त अष्टपैलू किंवा फलंदाज खेळवण्याचा विचार कोहली नक्की करेल.

कोणत्या स्थानासाठी चुरस? चौथ्या क्रमांकासाठी फलंदाज, राखीव सलामीवीर, राखीव यष्टिरक्षक आणि फिरकीपटू की चौथा जलदगती गोलंदाज, या स्थानांसाठी चुरस होणार आहे.   

उमेदवार कोण?

  • चौथ्या स्थानासाठी अंबाती रायुडू, रिषभ पंत, विजय शंकर आणि लोकेश राहुल यांचा पर्याय उपलब्ध आहे. 
  • राखीव यष्टिरक्षकः रिषभ पंत किंवा दिनेश कार्तिक
  • तिसरा फिरकीपटूः रवींद्र जडेजा 
  • चौथा जलदगती गोलंदाजः उमेश यादव, खलील अहमद, सिद्धार्थ कौल
  • अन्य पर्यायः नवदीप सैनी, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ 
टॅग्स :वर्ल्ड कप २०१९बीसीसीआयविराट कोहली