Join us  

ICC World Cup 2019 : भारताच्या विमानाचं टेक ऑफ होण्यापूर्वी लँडिंग; वर्ल्ड कपला जाणार कसे?

ICC World Cup 2019 : इंडियन प्रीमिअर लीगचा आणखी एक हंगाम संपला... या लीगमध्ये विविध संघात विखूरलेले भारतीय खेळाडू आता वर्ल्ड कपच्या तयारीसाठी एकत्र आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 10:02 AM

Open in App
ठळक मुद्देभारतीय संघ 22 मे रोजी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रवाना होणार आहेभारतीय संघाचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहेभारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला 16 जूनला

मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंडियन प्रीमिअर लीगचा आणखी एक हंगाम संपला... या लीगमध्ये विविध संघात विखूरलेले भारतीय खेळाडू आता वर्ल्ड कपच्या तयारीसाठी एकत्र आले आहेत. इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघच जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या वर्षभरात परदेशात वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे इंग्लंडमध्येही विराटसेनेचाच दबदबा राहील असा क्रिकेटचाहत्यांना विश्वास आहे. 30 मे पासून सुरू होणाऱ्या या महासंग्रामासाठी भारतीय संघ 22 तारखेला रवाना होणार आहे, परंतु ते ज्या विमानानं जाणार होते, ती जेट एअरवेज कंपनी आर्थिक नुकसानामुळे बंद पडली. त्यामुळे विराटसेनेला अखेरच्या क्षणी दुसऱ्या विमान कंपनीची शोधाशोध सुरु करावी लागली आहे.

भारताच्या 30 जणांच्या चमूला बिझनस क्लास सेवा पुरवेल अशा विमानाच्या शोधात बीसीसीआय आहे. ''हे फार मोठे आव्हान आहे, परंतु ते पार करू. भारतीय संघ ठरलेल्या तारखेला म्हणजेच 22 मे ला लंडनसाठी रवाना होणार आहे,'' अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली. बीसीसीआयने ही समस्या सोडवण्यात यश मिळवले आहे. त्यांनी एमिरेट्स एअरवेजचा पर्याय निवडला असून भारतीय संघ याच विमानातून लंडनसाठी रवाना होणार आहे. भारतीय संघ 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.  

संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.

पाकिस्तानसह 'हे' सात देश भारताच्या पुढे, कसा जिंकणार वर्ल्ड कप?कोणत्याही संघाचे यश हे खेळाडूंची तंदुरुस्ती आणि फॉर्म यावर अवलंबून असते. याच बाबतीत भारतीय संघ पिछाडीवर आहे आणि ही विराटसाठी डोकेदुखी ठरू शकते. विशेष म्हणजे भारतापेक्षा पाकिस्तानचे खेळाडू तंदुरुस्त आहेत, अशा परिस्थितीत भारतीय संघ खरचं वर्ल्ड कप जिंकेल का, हा प्रश्न उपस्थित राहत आहे.

पाकिस्तानी खेळाडूंनी तंदुरुस्तीच्या बाबतीत भारतीय खेळाडूंना मागे टाकले आहे. पाकिस्तान संघातील 26 वर्षीय मोहम्मद रिझवानने यो-यो चाचणीत 21 गुण, तर 24 वर्षीय गोलंदाज हसन अलीनं 20 गुण मिळवले आहेत. जगातील सर्वोत्तम फलंदाज कोहलीला या चाचणीत 19 गुण मिळाले होते. कोहली हा भारतीय संघातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू आहे. भारताच्या वरिष्ठ आणि भारत A संघात स्थान मिळवण्यासाठी यो-यो चाचणीत 16.1 गुणांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर पाकिस्तान संघाने हीच मर्यादा 17.4 इतकी ठेवली आहे. 

टॅग्स :वर्ल्ड कप २०१९बीसीसीआयविराट कोहलीइंग्लंड