Join us  

ICC World Cup 2019 : सुपर ओव्हरही झाली टाय, मग इंग्लंड विश्वविजेता झाला तरी कसा...

सुपर ओव्हरमध्येही इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोघांनीही प्रत्येकी १५ धावा केल्या. पण तरीही इंग्लंडला विश्वविजयी कसे घोषित करण्यात आले, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 1:01 AM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम फेरीचा सामना चांगलाच रंगला. हा सामना ५० निर्धारीत षटकांमध्ये टाय झाला. त्यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोघांनीही प्रत्येकी १५ धावा केल्या. पण तरीही इंग्लंडला विश्वविजयी कसे घोषित करण्यात आले, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

नियम काय सांगतो...सुपर ओव्हरमध्ये जर टाय झाली तर दोन्ही संघांपैकी कोणी जास्त चौकार लगावले हे पाहिले जाते. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना दोन चौकार लगावले, तर न्यूझीलंडला एकही चौकार लगावता आला नाही. त्यामुळे इंग्लंडला सुपर ओव्हरमध्ये जास्त चौकार लगावल्यामुळे विश्वविजेता घोषित करण्यात आले.

इंग्लंडने कसा केला विजयाचा जल्लोष, पाहा व्हिडीओइंग्लंडच्या संघाने आतापर्यंत पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला. पण या विश्वविजयाचा जल्लोष इंग्लंडच्या संघाने केला तरी कसा, ते पाहा खास व्हिडीओमध्ये

हा पाहा खास व्हिडीओ

बेन स्टोक्स ठरला इंग्लंडच्या विश्वविजयाचा शिल्पकार, सचिननेही केले कौतुकइंग्लंडच्या विश्वविजयाचा शिल्पकार ठरला तो अष्टपैलू बेन स्टोक्स. कारण स्टोक्सने अखेरपर्यंत किल्ला लढवत ८४ धावांची अतुलनीय खेळी साकारली. त्याचबरोबर सुपर ओव्हरमध्येही त्याने दमदार फलंदाजी केली. त्यामुळेच स्टोक्सला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्टोक्सला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिला आणि त्याचे कौतुकही केले.

'हाच' तो इंग्लंडचा विश्वविजयाचा क्षणइंग्लंडने पहिल्यांदाच विश्वचषकाला गवसणी घातली. न्यूझीलंडविरुद्धचा अंतिम फेरीचा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये बाजी मारत इंग्लंडने विश्वचषक जिंकला. पण नेमक्या इंग्लंडने कोणत्या क्षणी विश्वचषक जिंकला ते पाहा....

इंग्लंडचे 'बॅट'लक; विश्वविजयासाठी ठरले निर्णायकइंग्लंडने अखेर विश्वचषकाला गवसणी घातली. पण इंग्लंडच्या या विश्वविजयात एका बॅटची निर्णायक भूमिका ठरली. अखेरच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बेन स्टोक्सने दोन धावा घेतल्या. पण या दोन धावा घेत असताना इंग्लंडला एकूण सहा धावा मिळाल्या आणि त्या फक्त एका बॅटमुळे मिळाल्या.

स्टोक्स फटका मारून दुसरी धाव घेण्यासाठी धावत सुटला. त्यावेळी त्याच्या दिशेने चेंडू फेकला गेला. त्यावेळी चेंडू स्टम्पच्या दिशेने जात असताना स्टोक्सची बॅट त्या बॉलला लागली आणि चौकार गेला. स्टोक्स हा प्रकार जाणीवपूर्वक केल्या नसल्यामुळे हा चौकार देण्यात आला. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019इंग्लंड