चेस्टर ली स्ट्रीट : जर-तरच्या फेऱ्यात सापडलेल्या श्रीलंकाला उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी सोमवारी वेस्ट इंडिजविरुद्ध कुठल्याही स्थितीत विजय मिळवावाच लागेल. विंडीज जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर गेले असून ते या लढतीत प्रतिष्ठा राखण्याच्या निर्धाराने उतरतील.
श्रीलंकाने इंग्लंडचा पराभव करीत धक्कादायक निकाल नोंदवला. त्यानंतर द. आफ्रिकेविरुद्ध ९ गड्यांनी पराभूत झाल्यामुळे त्यांच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या समीकरणाला धक्का बसला. श्रीलंका सात सामन्यात सहा गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे आणि उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांना उर्वरित सर्व लढतींमध्ये विजय मिळवण्यासाठी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्या सामन्यांतील निकाल अनुकूल ठरतील, अशी आशा बाळगावी लागेल.
द. आफ्रिकेविरुद्ध यापूर्वीच्या लढतीत संघाची फलंदाजी निराशाजनक ठरली होती. अशा स्थितीत कर्णधार दिमुथ करुणारत्ने विंडीजविरुद्धच्या लढतीत यात सुधारणा करण्यास प्रयत्नशील राहील. निराशाजनक फलंदाजीमुळे संघाच्या गोलंदाजीवर दडपण येत आहे.
सामना : दुपारी ३ वाजतापासून
(भारतीय वेळेनुसार)