Join us  

ICC World Cup 2019: विश्वचषकातून बाहेर पडल्यावर धवन झाला भावुक, लिहिला खास संदेश...

धवनने एक भावुक संदेश चाहत्यांसाठी लिहीला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 8:35 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे भारताचा सलामीवीर शिखर धवनला विश्वचषकाला मुकावे लागेल. पण ही गोष्ट धवनच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यानंतर धवनने एक भावुक संदेश चाहत्यांसाठी लिहीला आहे.

भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला मोठा धक्का बसला. अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे भारताचा सलामीवीर शिखर धवनला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे रिषभ पंतचा मार्ग मोकळा झाला आहे. धवन तीन आठवड्यात दुखापतीतून सावरेल असे सांगण्यात येत होते, परंतु तो सावरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यानं उर्वरित स्पर्धेतून माघार घेतली आहे. IANSला बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली. ''धवन वर्ल्ड कप खेळण्यासाठी फिट नसून त्याला रिकव्हर होण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी लागेल. त्यामुळे तो वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेत आहे,'' असे सूत्रांनी स्पष्ट केले.  

आपल्या या पोस्टमध्ये धवनने लिहिले आहे की, " विश्वचषकातून बाहेर पडताना मी फाक भावुक झालो आहे. दुर्देवाने माझ्या अंगठ्याची दुखापत बरी होऊ शकलेली नाही. पण विश्वचषक सुरु राहायलाच हवा. मला संघातील खेळाडूंनी, देशवासियांनी आणि चाहत्यांनी जो पाठिंबा दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार. जयहिंद." 

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांविरुद्घचे सामने जिंकून वर्ल्ड कप स्पर्धेत जोरदार सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला जबरदस्त धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत घणाघाती शतकी खेळी करणारा डावखुरा सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना हाताला झालेल्या दुखापतीमुळे धवनला तीन आठवडे संघाबाहेर राहावे लागणार होते, पण आता त्याला स्पर्धेलाच मुकावे लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या लढतीत शिखर धवनने शानदार शतकी खेळी केली होती. त्याने रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीसमवेत केलेल्या मोठ्या भागीदाऱ्यांमुळे भारतीय संघाला साडेतीनशेपार मजल मारता आली होती. मात्र या खेळीदरम्यान पॅट कमिन्सचा एक उसळता चेंडू हातावर बसून शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. दुखापत बळावल्याने तो क्षेत्ररक्षणालाही येऊ शकला नव्हता. 

दरम्यान,  दुखापतीतून सावरून तो 10-12 दिवसांत तो कमबॅक करेल असा विश्वास व्यक्त केला जात होता.''त्याच्या अंगठ्याला प्लास्टर करण्यात आले आहे आणि पुढीत काही दिवस ते तसेच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्या दुखापतीची चिकिस्ता करण्यात येईल. आशा करतो की तो साखळी फेरीच्या मध्यंतराच्या सत्रात पुनरागमन करेल आणि उपांत्य फेरीचा सामनाही खेळे,'' असे सांगण्यात आले होते. स्वस्थ बसेल तो 'गब्बर' कसला, कमबॅकसाठी धवनची कसरत, Videoधवनही दुखापतीतून सावरण्यासाठी कसून मेहनत घेत होता. दुखापततही तो स्वस्थ बसलेला नाही, त्यानं जिममध्ये भरपूर घाम गाळला. त्याचा या जिममधील वर्क आऊटचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

टॅग्स :शिखर धवनवर्ल्ड कप 2019