Join us  

ICC World Cup 2019 : भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाची किंमत ऐकाल तर हैराण व्हाल...

एका तिकीटाची किंमत ऐकून सौरव गांगुलीलाही बसला धक्का.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 6:29 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. पाकिस्तान : आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे ते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महासंग्रमावर. हा सामना मँचेस्टर येथे होणरा आहे आणि आतापासूनच तिकिटांचा काळाबाजार सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या काळाबाजारात फक्त एका तिकीटाच किंमत ऐकाल तर तुमच्या पायाखालची जमिन सरकल्याशिवाय राहणार नाही.

आतापर्यंत विश्वचषकात झालेल्या सामन्यांमध्ये भारताला एकदाही पाकिस्तानकडून पराभूत व्हावे लागलेले नाही. विश्वचषकातील सर्वच सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात नक्की काय घडते, भारत विजयाची परंपरा कायम राखणार की पाकिस्तान पराभवाची मालिका खंडीत करणार, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.

भारत आणि न्यूझीलंड हा सामना पावसामुळे वाया गेला. पण यावेळी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली समालोचन करत होता. त्यावेळी त्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या तिकीटांचा एक किस्सा सांगितला. गांगुली म्हणाला की, " भारत आणि पाकिस्तान सामन्याची क्रेझ काही वेगळीच असते. रविवारी होणाऱ्या सामन्याच्या तिकीटांची मी एका व्यक्तीला किंमत विचारली. त्यावर त्याने मला जो आकडा सांगितला, ते ऐकून मी चकितच झालो. भारत आणि पाकिस्तान सामन्याचे एक तिकीट सध्याच्या घडीला १५०० पाऊंडला (१, ३५, ००० रुपये) मिळत आहे."

पाकचा सामना कसा कराल, 'विराट'सेनेसाठी तेंडुलकरचा मास्टर प्लानपावसामुळे भारत-न्यूझीलंड सामना रद्द झाल्यानंतर सर्वांचे लक्ष रविवारच्या लढतीकडे लागले आहे. येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान हे पक्के शेजारी अन् कट्टर वैरी समोरासमोर येणार आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत या प्रतिस्पर्धींचा सामना पाहण्याची संधी कोणीच दवडू इच्छित नाही. या महत्त्वाच्या सामन्यासाठी महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं भारतीय संघाला एक मास्टर प्लान दिला आहे.रविवारच्या सामन्यात मोहम्मद आमीर आणि वाहब रियाज हे गोलंदाज भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरतील असे मत, 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य असलेल्या तेंडुलकरनं व्यक्त केले आहे. तो म्हणाला,''भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली हे सर्वाधिक अनुभवी फलंदाज आहेत आणि पाकिस्तानने त्यांच्याविरोधात नक्की रणनीती तयार केली असेल. आमीर व रियाज हे दोघंही रोहित व विराटची विकेट घेण्यासाठी प्रयत्न करतील, परंतु त्याचवेळी रोहित व विराट त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज असतील. माझा सल्ला असा आहे की अन्य खेळाडूंनी त्यांना साथ द्यावी.'' आमीरनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पाच विकेट घेत विक्रमी कामगिरी केली. तेंडुलकरनं आमीरच्या गोलंदाजीचे कौतुक केले. ''ऑस्ट्रेलियाविरुद्ध आमीरचा पहिला स्पेल अचूक होता. अॅरोन फिंचची त्यानं  तारांबळ उडवली होती. त्याचा सामना करताना भारतीयांनी सकारात्मक दृष्टीकोनानं खेळावं. त्याच्याविरोधात काहीही वेगळं करण्याची गरज नाही. संयम बाळगा,'' असे तेंडुलकर म्हणाला.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानवर्ल्ड कप 2019